३१५ लाभार्थ्यांना आयुष्यमान भारत कार्डचे वाटप

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि.०१ :   समाजातील विविध घटकांसाठी शासनाच्या अनेक योजना उपलब्ध आहेत. पात्र लाभार्थ्यांनी निकषाप्रमाणे लागणा-या कागदपत्रांची उपलब्धता करुन दिल्यास त्यांचा लाभ सर्वसामान्य नागरीकांना अधिक सुलभ होईल. आरोग्य विषयक वैदयकीय सोयीसुविधांसाठी आयुष्यमान भारत योजनेचा लाभ घ्यावा. नागरीकांच्या सुविधांसाठी म.न.से.ने राबविलेल्या आयुष्यमान भारत कार्ड वाटप उपक्रम स्तुत्य असल्याचे प्रतिपादन तहसलिदार प्रशांत सांगडे यांनी केले.    

Mypage

शहरातील माळी गल्लीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष गणेश रांधवणे यांनी आयोजीत केलेल्या आयुष्यमान भारत कार्डचे वाटप तहसिलदार प्रशांत सांगडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सांगडे बोलत होते. यावेळी पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष कैलास बुधवंत, महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे तालुकाध्यक्ष सचिन सातपुते, रमेश डाके, वसुधा सावरकर, राजश्री रसाळ, जनार्दन रायकर, दत्तात्रय कांबळे, किरण डाके, आदिनाथ साबळे, विठ्ठल तुपे, संजय गवळी, विठ्ठल दुधाळ, संदिप बडधे, मिलिंद धोंडे, अमोल परदेशी, दत्तात्रय नांगरे, सुनिल गवळी, मंगेश लोंढे आदी प्रमुख उपस्थित होते.

tml> Mypage

यावेळी माळी गल्लीतील ३१५ नागरिकांना कार्डचे वाटप करण्यात आले. मनसेचे तालुकाध्यक्ष रांधवणे यांनी प्रास्ताविक केले. सुत्रसंचालन सत्यविजय शेळके यांनी केले. तर निवृती आधाट यांनी आभार मानले. 

Mypage