वाघोलीच्या तंटामुक्ती अध्यक्षपदी सुभाष दातीर

शेवगाव प्रतिनिधी, दि. २ : तालुक्यातील माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार प्राप्त आदर्शगाव वाघोली  गावाच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदी सुभाष कारभारी दातीर यांची एक मताने निवड  करण्यात आली आहे.

        वाघोलीच्या लोकनियुक्त सरपंच सौ.सुस्मिता उमेश भालसिंग यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा व जनता दरबाराचे आयोजन करण्यात आले होते. त्यात संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत विविध योजनावर मंथन करण्यात आले. माजी तंटामुक्ती अध्यक्ष  रामभाऊ पवार  यांनी राजीनामा दिल्याने ती जागा रिक्त झाली होती.

यावेळी माजी सरपंच बाबासाहेब गाडगे यांनी तंटामुक्ती अध्यक्ष सुचनेचा प्रस्ताव मांडला. राजेंद्र जमधडे यांनी अनुमोदन दिले. त्यास ग्रामस्थांनी ग्रामसभेत एकमुखाने मंजुरी दिली.

       भाजप युवा मोर्चाचे जिल्हा ग्रामपंचायत स्तरावर मागील पाच वर्षापासुन सर्वभांडण तंटे गावातच मिटवले जातात. त्यामुळे गावात एकोपा टिकवुन राहतो. गावातील सर्व जाती धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात.

      यावेळी  सर्व विभागाचे खाते प्रमुख  उपस्थित होते. शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती शैलजा राऊळ, मंडळ कृषी अधिकारी गणेश वाघ, कृषी पर्यवेक्षक सुनील होडशीळ, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुशील बडे, आरोग्य सेवक संभाजी आव्हाड, महावितरणचे पांडुरंग बडे, कुलकर्णी, प्रभाग समन्वयक दीपक अवांदकर, शिक्षक वृंद, पशु वैद्यकीय प्रतिनिधी ज्ञानेश्वर सोंडे, महसूलचे मंडळ अधिकारी आप्पासाहेब शिंदे, उपस्थित होते.

त्यांनी खातेनिहाय सर्व शासकीय योजना ग्रामस्थांना समजाऊन सांगितल्या. त्यांच्या पुर्ततेसाठी सहकार्याची ग्वाही दिली. ग्रामस्थांनीही  विविध योजना समजून घेतल्या. भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष उमेश  भालसिंग यांच्यासह सर्व ग्रामपंचायत सदस्य,  राजेंद्र जमधडे,रावसाहेब शिंगटे, पांडुरंग भालसिंग, मोहन गवळी, शुभम बोरुडे, , अंगणवाडी व आशा सेविका  उपस्थित होत्या. ग्रामसेविका जनाबाई फटाले यांनी आभार मानले.