श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिन संपन्न

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २ : श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयात डॉ. सी व्ही रमण यांच्या स्मरणार्थ २८ फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिन म्हणून उत्साहाने संपन्न झाला.या प्रसंगी गटशिक्षणाधिकारी श्रीमती शबाना शेख यांच्या हस्ते डॉ. सी.व्ही.रमण यांचे प्रतिमेचे पुजन करण्यात आले.

मान्यवरांचे स्वागत मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर यांनी केले. उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी शबाना शेख होत्या. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन  विद्यार्थिनी गायत्री चंदाले व अरीबा शाह यांनी केले. साई कुलकर्णी या विद्यार्थ्याने डॉ. सी. व्ही. रमण यांच्या जीवनकार्याची माहिती दिली.

वेदांत येवले याने दैनंदीन जीवनातील विज्ञानाचे महत्त्व विषद केले. उजमा शेख हीने अंधश्रद्धा निर्मूलनावर विज्ञान कथा सादर केली. विद्यालया मध्ये विज्ञान मंच या उपक्रमाअंतर्गत ‘ कुतूहल – मला उत्तर हवंय’ या नावाने विज्ञान प्रश्न पेटी  स्थापन करण्यात आली आहे. ज्या विद्यार्थ्यांना दैनंदिन जीवनात घडणाऱ्या, ऐकलेल्या, वाचनात येणाऱ्या किंवा पाहिलेल्या घटना, बातम्या यांविषयी अनेक प्रश्न पडतात. विशिष्ट गोष्ट अशीच का घडते, अमुक एक गोष्ट घडण्यामागे  वैज्ञानिक कारण काय आहे अशी जिज्ञासा विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण होते. 

त्याला विज्ञान शिक्षक कुलदीप गोसावी सर यांनी विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासह उत्तरे दिली. यावेळी मुख्याध्यापक  मकरंद कोऱ्हाळकर यांनी हा उपक्रम निरंतर चालणारा असल्याने विद्यार्थ्यांनी वेळोवेळी त्यांना पडणारे प्रश्न लिहून या पेटीत टाकावेत असे आवाहन  केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सौ. संजीवनी डरांगे यांच्यासह विविध शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले. 

संस्थेचे अध्यक्ष कैलास ठोळे, सचिव दीलीप अजमेरे, स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, सहसचिव सचिन अजमेरे , स्कूल कमिटी सदस्य संदीप अजमेरे, डॉ.अमोल अजमेरे, श्री. राजेश  ठोळे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.विदयालयाच्या पर्यवेक्षिका श्रीमती उमा रायते यांनी आभार मानले.