शेवगाव तालुक्यात १० वीच्या परीक्षेला बसले ४,३९९ विद्यार्थी

शेवगाव प्रतिनिधी, दि. २ : शेवगाव शहर व तालुक्यात इयत्ता १० वीच्या परीक्षेला गुरुवारी सुरळीतपणे सुरुवात झाली. तालुक्यात या परीक्षेसाठी एकुण ९ केंद्र असून परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या ४ हजार ३९९ असून पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचा इयत्ता १० वीच्या परीक्षा सुद्धा कॉपी मुक्त वातावरणात पार पाडण्याचे नियोजन असल्याचे सांगून त्यासाठी विविध पथके स्थापन करण्यात आल्याची माहिती पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी तृप्ती कोलते यांनी दिली.      

यावेळी तहसील कार्यालयात भेटीसाठी आलेल्या प्रांताधिकारी प्रसाद मते, तहसीलदार छगनराव वाघ, गटविकास अधिकारी महेश डोके यांनी तालुक्याच्या ग्रामीण भागातील काही परीक्षा केंद्रांना भेटी देवून परीक्षा व्यवस्थेची पहाणी केली. जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी  शिक्षण प्रशासनाला इयत्ता १२ वी प्रमाणेच १० वीच्या परीक्षा सुद्धा कॉपी मुक्त वातावरणात पार पाडण्याच्या सूचना दिल्या आहेत.  

       तालुक्यात असलेले परीक्षा केंद्र व परीक्षार्थी विद्यार्थ्यांची संख्या पुढील प्रमाणे _
शहरातील बाळासाहेब  भारदे हायस्कूल = ५९३, रेन्सीडेन्सीअल हायस्कूल – ९०१, आबासाहेब काकडे विद्यालय= ५२९,
तर तालुक्यातील बोधेगाव येथील श्री शिवाजी हायस्कूल – ५६१, नवजीवन विद्यालय दहीगावने =५५७, श्रीराम विद्यालय ढोरजळगाव – २६८, चापडगाव हायस्कूल – ५४६, श्रीमती ठकुबाई घाडगे पाटील विद्यालय ढोरजळगावणे = २३१, संत भगवान बाबा माध्यमिक विद्यालय गोळेगाव = २१३.