ऐतिहासिक नाणी प्रदर्शनातून इतिहास जोपासण्याचा प्रयत्न

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. १ : येथील निर्मलाताई काकडे आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेज मध्ये प्राचीन दुर्मिळ ऐतिहासिक नाणी प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. काकडे शैक्षणिक समूहाचे  प्रा. लक्ष्मणराव बिटाळ, अभियंता गायकवाड  व प्राचार्य डॉ दुकळे यांच्या हस्ते करण्यात आले.

Mypage

       काही अवलीयांचा छंद सामान्य माणसाच्या ज्ञानात भर घालणारा असतो. त्यात तो छंद दुर्मिळ वस्तूंचा असेल तर या वस्तू पाहण्याची पर्वणीच  असते. असाच जगभरातील अनेक देशांच्या दुर्मिळ चलनी नाण्यांचा छंद श्रीक्षेत्रअमरापूर  येथील महेश रामलाल लाडणे यांनी जोपासला आहे.इतिहास विषयात पदव्यूत्तर शिक्षण घेतलेल्या  लाडणे यांना ९ वी पासूनच वेगवेगळी दुर्मिळ नाणी जमा करण्याचा छंद लागला.  

Mypage

यातूनच भारतातील तसेच विविध देशातील८०० पेक्षा जास्त नाणी आणि ९० पेक्षा अधिक नोटा त्यांनी जमविल्या आहेत.  लाडणे यांच्या कडे मध्ययुगीण (शिवकालीन), ब्रिटीश कालीन तसेच आधुनिक कालखंडातील नाणी आहेत. भारत सरकारने वेळोवेळी विशेष दिना निमित्त काढलेली दुर्मिळ नाणी सुद्धा त्यांनी संग्रहित केली आहेत तसेच विदेशी नाण्यामध्ये सुमारे ४५ देशांतील नाणी  आहेत.    लाडणे यांच्याकडे असणारा दुर्मिळ ठेवा इतिहासाच्या अभ्यासकांसाठी मोलाचा आहे. 

Mypage

    प्रा.  प्रशांत वाघ, अविनाश सातपुते, अमोल खोसे, अमोल आहेर, श्रीकृष्ण गंगावणे, निकिता बोरुडे, जयश्री मिरड, कापसे कोमल, रिता धिवर,  कर्मचारी, विद्यार्थी  उपस्थित होते . प्राचार्य डॉ.दुकळे यांनी प्रास्ताविक केले.प्रा.निजवे संतोष यांनी सुत्रसंचलन केले, प्रा. सोनाली असणे यांनी आभार मानले. 

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *