केंद्रीय शिक्षक सखाहरी मेहेखांब यांचे निधन

शनिवार ३१ डिसेंबर २०२२ रोजी जलदान विधी  

कोपरगाव प्रतिनिधी दि.२८: कोपरगाव तालुक्यातील सुरेवगाव येथील केंद्रीय क्रीडा शिक्षक सखाहरी ञ्यंबक मेहेरखांब यांचे वयाच्या ८७ व्या वर्षी वृद्धापकाळाने सोमवारी नाशिक येथे निधन झाले. स्व.सखाहरी मेहेरखांब यांनी देशभरातील हजारो विद्यार्थांना विविध खेळांचे धडे शिकवून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पटलावर चमकावले आहेत.

तालुक्यातील नामवंत क्रीडा शिक्षकापैकी एक असलेल्या सेवा निवृत्त क्रिडा शिक्षकाच्या निधनाची माहीती कळताच पंचक्रोशीतील नागरीकांनी शोक व्यक्त केला. स्व. सखाहरी मेहेरखांब यांच्या पाश्चात दोन मुलं, चार मुली नातवंडे असा मोठा परिवार आहे. पञकार सिध्दार्थ मेहेरखांब यांचे ते वडील होते.

स्व. मेहेरखांब यांच्या निधनाबद्दल आमदार आशुतोष काळे, माजी आमदार अशोकराव काळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, युवा नेते स्नेहलता कोल्हे, पंचाय समितीच्या माजी सभापती पौर्णिमा जगधने, पञकार संघाचे अध्यक्ष प्रा. साहेबराव दवंगे यांनी शोकव्यक्त केला आहे.

शनिवार दि. ३१ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ९.३० वा. मेहेरखांब वस्ती सुरेगाव रोड, ता. कोपरगाव येथे जलदान विधी संपन्न होणार आहे.