मोदीमुळे परदेशात भारताचा दबदबा – केंद्रीय मंत्री कराङ

शेवगाव प्रतिनिधी, दि. २: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गेल्या ८ वर्षीच्या आपल्या कार्यकाळात अर्थ, शेती, आरोग्य, शिक्षण, रस्ते विकास, दळणवळण आदी विविध क्षेत्रात नेत्र दीपक कामगीरी बजावली आहे. मोदी सरकारच्या गरीब कल्याण योजने अंतर्गत मोफत धान्य योजनेचा ८० कोटी जनतेला लाभ सुरु आहे, प्रधानमंत्री जनधन योजनेतून सुमारे ४६ कोटी लोकांचे झिरो बॅलन्सने खाते उघडण्यात आले आहे, किसान सन्मान योजनेचा सुमारे १२  कोटी शेतकऱ्यांना लाभ मिळत आहे.

समाजातील गरीबातल्या गरिबाला विविध माध्यमातून मदत उपलब्ध करून देण्याचे काम सुरू आहे. मुद्रा लोनचाही सुसुक्षित बेरोजगारांना लाभ मिळतो आहे. कोविडच्या मुकाबल्यासाठी कोट्यवधी लोकांना मोफत लसीकरण करून जगात सर्वात मोठे आरोग्य सेवेचे काम केले आहे. त्यामुळे इतर देशांच्या तुलनेत आपल्याकडे साथीचा प्रादुर्भाव रोखता आला. आरोग्य सेवेचे हे यश सर्वात मोठे असल्याने जगभरात आपल्या देशाचा दबदबा वाढला असल्याने यापुढील काळातही जनतेने पंतप्रधान मोदी यांनाचआपले समर्थन द्यायला हवे असे अवाहन केंद्रीय अर्थ राज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी केले.

      पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमिताने दिनांक १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोबर दरम्यान आयोजित केलेल्या राष्ट्र नेता ते राष्ट्र पिता सेवा पंधरवाडा अंतर्गत ररविवारी आयोजित करण्यात आलेल्या पंतप्रधान  मोदी यांच्या जीवनकार्यावर आधारित चित्र प्रदर्शनाचा शुभारंभ केंद्रीय मंत्री डॉ कराड यांच्या हस्ते खा. डॉ सुजय विखे , आ मोनिका राजळे, भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. यानिमित्ताने शहरात वृक्षारोपण, स्वछता अभियान, शहरातील भोईराज तरुण मंडळाने येथील बाजार पेठेत आयोजित केलेल्या शक्तीपीठ मातेच्या देखाव्याची आरती आदी कार्यक्रम पार पडले.

         यावेळी  डॉ. कराड पुढे म्हणाले की, अहमदनगर जिल्हा विशेषतः शेवगाव पाथर्डी तालुका आमच्या औरंगाबाद जिल्ह्या नजीक असल्याने परीसरातील विविध विकास कामांसाठी सहकार्य  करण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली . शेवगाव पाथर्डी दोन्ही तालुक्यात नाबार्ड योजने अंतर्गत रस्ते पुल तसेच गरज असेल तिथे राष्ट्रीयकृत बँकांच्या शाखा व जिथे अडचणी असतील तिथे नजीकच्या पोस्ट ऑफिस मधुन लोकांना मदत होईल या दृष्टीने सहकार्य करण्याचे स्पष्ट करून भाजप व मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केंद्र राज्य सरकारच्या विविध विकास योजनाचा लाभ शेवटच्या माणसापर्यंत पोहचेल हे पहावे.

आ. राजळे यांनी तालुक्यातील विविध रस्ते तसेच इतर प्रलंबित विकास कामासाठी केंद्रीय मंत्री डॉ कराड यांची तर खासदार डॉ विखे यांचेकडे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलांसाठी शैक्षणिक कर्ज योजनेतून नाबार्ड अंतर्गत मदतीची मागणी केली. जेष्ठ नेते बापुसाहेब भोसले, तालुका अध्यक्ष ताराचंद लोढे, बापुसाहेब पाटेकर, दिनेश लव्हाट, पाथर्डीचे माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, सालार शेख, भीमराज सागडे, कचरू चोथे, तुषार वैद्य, उदय मुंढे, गणेश कोरडे, गणेश कऱ्हाड, दिगम्बर काथवटे, आशा गरड, उषा कनगणकर, संदीप वाणी, कैलास सोनवणे, सचिन वारकड, गुरुनाथ माळवदे, दीपक बडे, विनायक खेडकर, अमोल घोलप आदींसह मान्यवरानची उपस्थिती होती वाय डी कोल्हे यांनी आभार मानले तर राजू सुरवसे यांनी सूत्रसंचालन केले.