श्री रेणुका माता मल्टीस्टेटच्या आमरापूर शाखेचा द्वितीय वर्धापन दिन संपन्न

शेवगाव प्रतिनिधी, दि. २ : देशातील नऊ राज्यात ११७ शाखांचा विस्तार आणि ७० हजार कोटीची वार्षिक उलाढाल असलेल्या रेणुकामाता मल्टिस्टेट संस्थेच्या  श्री क्षेत्र अमरापूर शाखेचा द्वितीय वर्धापनदिन आज मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी सरपंच विजय पोटफोडे होते. यावेळी बाळासाहेब चौधरी, श्रीमंत घुले, भागनाथ काटे, अरुण बोरूडे, मेजर महेश फुंदे, ठेवीदार, खातेदार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

      श्रीमंत घुले यांनी प्रास्ताविक करतांना श्री रेणुकामाता माल्ट स्टेटसंस्थेच्यT प्रगतीचा आढावा घेऊन संस्थेचे प्रवर्तक जेष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर प्रशांत भालेराव यांच्या सामाजिक कार्याविषयी माहिती दिली. शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त सर्व रोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या  शिबिरामध्ये एकुण १०२ रुग्णांची तपासणी करण्यात आली. सामाजिक कार्यकर्ते रो .बाळासाहेब चौधरी यांनी रुग्णांना मार्गदर्शन केले.

       डॉ. गणेश चेके, डॉ. अरविंद पोटफोडे यांनी विविध रुग्णाची तपासणी करून त्यांच्यावर औषधोपचार केले. गणेश ऑप्टिकल्स अहमदनगरचे आकाश पुरी यांनी रुग्णांना अल्पदरात चष्मे दिले. बुधराणी हॉस्पिटलचे डॉ. अमित पिल्ले  यांनी नेत्ररूग्ण तपासणी करून १४ जणांना डोळ्याच्या ऑपरेशन साठी निवडले. उद्या दि. ३ ऑक्टोबर रोजी बुधराणी हॉस्पिटल पुणे येथे त्यांच्यावर नेत्रशस्रक्रिया करण्यात येणार आहे. शिबिराचे आयोजन रेणुकामाता मल्टी स्टेट संस्था, रोटरी क्लब,  बुधराणी हॉस्पिटल पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले.

        कार्यक्रमासाठी रोटरीचे माजी सहप्रांतपाल डॉ. संजय लड्डा, रेणुकामाता मल्टिस्टेटचे  मुख्य कार्यकारी अधिकारी हरिश्चंद्र मोरे,  उपसरपंच शारदा बोरुडे,  डॉ. हरिश्चंद्र गवळी, अमरापूर वि.वि.का सोसायटीचे चेअरमन बाळासाहेब पोटफोडे आदि मान्यवर उपस्थित होते.