रेणुका विवेक कोल्हे यांना ज्ञानज्योती पुरस्कार प्रदान

Mypage

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १० : शिक्षण सहकार सामाजिक कार्यातील योगदानाबददल शिर्डी प्रेस क्लबने जागतिक महिलादिनानिमीत्त सावित्रींच्या लेकींच्या सन्मानार्थ संजीवनी शैक्षणिक कृषि ग्रामिण विकास विश्वस्थ संस्थेच्या रेणुका विवेक कोल्हे यांना ज्ञानज्योती पुरस्कार भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनी राधाकृष्ण विखे यांच्या हस्ते शुक्रवारी शिर्डी येथे प्रदान करण्यांत आला. रेणुका कोल्हे यांनी हा पुरस्कार महिला बचतगट चळवळीतील महिलांसह शिक्षणमहर्षी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांना अर्पण केला आहे. 

Mypage

             भाजपा महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ याप्रसंगी बोलतांना म्हणाल्या की, राज्यात सर्वच क्षेत्रात महिलांनी मोठया प्रमाणांत सहभाग घेवुन योगदान दिले आहे. त्यांतुन महिला बचतगट चळवळीचे कार्य विस्तारले परिणामी ग्रामिण भागातील महिलांना हक्काचे व्यासपिठ निर्माण झाले आहे. या सावित्रीच्या लेकींचा आपल्या हातुन जो सन्मान झाला तो कौतुकास्पद आहे. 

Mypage

रेणुका कोल्हे म्हणाल्या की, सासर आणि माहेर या दोन्ही ठिकाणचा नांवलौकीक सामाजिक कार्यातुन वाढविण्यांसाठी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे, भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे, जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले, कोपरगांव विधानसभा मतदार संघातील महिला बचतगट चळवळीतुन सामाजिक कार्यात सहभागी होता आले.

Mypage

ग्रामिण भागातील मुला-मुलींचा शैक्षणिक स्तर वाढविण्यासाठी जाणिवपुर्वक प्रयत्न सुरू आहेत. ज्ञानज्योती पुरस्कार हा कामाचाच एक भाग आहे. हा सन्मान आपला नसुन सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा आहे. याप्रसंगी माजी नगरसेविका सुवर्णा सोनवणे, हर्षा कांबळे, दिपा गिरमे, विद्या सोनवणे, विजया देवकर, शिल्पा रोहमारे आदि महिला उपस्थित होत्या. या पुरस्काराबद्दल रेणुका कोल्हे यांचे सर्व थरातून अभिनंदन होत आहे.

Mypage