लायन्स, लीनेस व लिओ क्लबचा सामाजिक उपक्रम कौतुकास्पद – पुष्पाताई काळे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : काळे परिवाराने नेहमीच सामाजिक उपक्रमांना साथ दिली आहे. समाजाच्या अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी ज्या सामाजिक संघटना काम करतात त्यांच्या समाजकार्यासाठी कर्मवीर शंकररावजी काळे व माजी आमदार अशोकराव काळे यांनी नेहमीच मदत केली आहे. तोच आदर्श आ. आशुतोष काळे जोपासत असून लायन्स, लीनेस व लिओ क्लबच्या सामाजिक उपक्रम कौतुकास्पद असून या उपक्रमांना कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाच्या वतीने नेहमीच सहकार्य राहील अशी ग्वाही गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका सौ. पुष्पाताई काळे यांनी दिली आहे. 

‘शिवबा माझा मानाचा, एक्स्पो आपल्या गावाचा’ या संकल्पनेतून महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे लायन्स, लिनेस व लिओ क्लब ऑफ कोपरगाव आयोजित व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना प्रायोजित ‘कोपरगाव बिजनेस एक्स्पो व सांस्कृतिक महोत्सव २०२३’ चे उदघाटन गुरुवार(दि.०९) रोजी गौतम सहकारी बँकेच्या माजी संचालिका.सौ. पुष्पाताई काळे यांच्या हस्ते पार पडले याप्रसंगी त्या बोलत होत्या.

काळे पुढे म्हणाल्या की, बचत गटाच्या महिलांना आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी गोदाकाठ महोत्सवाचे आयोजन केले जात असून त्यामुळे बचत गटाच्या महिलांना हक्काची बाजारपेठ मिळाली आहे. मागील १३ वर्षापासून लायन्स, लिनेस व लिओ क्लब देखील दरवर्षी ‘बिजनेस एक्स्पोचे’ आयोजन करीत असून दिवसेंदिवस ‘बिजनेस एक्स्पो’ ची व्याप्ती वाढत आहे. त्यामुळे कोपरगाव शहराच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी मोठी मदत होत असून समाजाला अपेक्षित असलेले उपक्रम लायन्स, लीनेस व लिओ क्लब राबवीत आहे हि अभिमानाची गोष्ट आहे.

उत्कृष्ठ नियोजन करून लायन्स, लीनेस व लिओ क्लबने आपले वेगळेपण सिद्ध केले असून पुढील वर्षीच्या बिजनेस एक्स्पोची संकल्पना तयार असून त्यासाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समूहाच्या वतीने आवश्यक ते सहकार्य करणार असल्याचे पुष्पाताई काळे यांनी यावेळी सांगितले. 

यावेळी माजी आमदार स्नेहलता कोल्हे, महाराष्ट्र राज्य पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, लायन्स क्लबचे अध्यक्ष परेश उदावंत, सेक्रेटरी बाळासाहेब जोरी, खजिनदार अंकुश जोशी, लिनेस क्लबच्या चार्टर्ड मल्टिपल प्रेसिडेंट डॉ. वर्षा झंवर, अध्यक्षा डॉ. अस्मिता लाडे, सेक्रेटरी अंजली थोरे, खजिनदार नेहा बत्रा, लिओ क्लबचे अध्यक्ष सुमित सिनगर, सेक्रेटरी धिरज कराचीवाला, खजिनदार यश बंब, एक्स्पो कमिटी सदस्य राजेश ठोळे, संदीप कोयटे, संदीप रोहमारे, राम थोरे, सुरेश शिंदे, नरेंद्र कुर्लेकर, राहुल नाईक, सत्येन मुंदडा, सुधीर डागा, बाबा खुबाणी, सुमीत भट्टड, किरण शिरोडे, माजी नगरसेवक गटनेते विरेन बोरावके, रमेश गवळी, गौतम बँकेचे संचालक सुनील शिलेदार, डॉ. तुषार गलांडे आदींसह लायन्स, लिनेस व लिओ क्लबचे सदस्य व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.