फलके यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

शेवगाव प्रतिनिधी, दि. १० : मित्र परिवाराचा आग्रह असताना देखील केवळ शब्द सुमनाच्या शुभेच्छा स्विकारत डामडौल टाळून येथील सामाजिक कार्यकर्ते तथा माजी नगर सेवक महेश फलके यांनी आपल्या वाढदिवसाचे निमित्ताने येथील खंडोबा नगर मधील वरुर रस्त्यावर मित्रांचे हस्ते वृक्षारोपण केले.

वृक्षरोपणानंतर त्याचे संवर्धन व्हावे यासाठी विशेष काळजी घेण्यात आली असून, रोपाला भक्कम व आकर्षक अशा लोखंडी जाळ्या बसवून त्यांना वेळच्या वेळी पाणी द्यायची कायम स्वरूपी व्यवस्था करण्यात आली आहे. नेहमी काही तरी हटके करण्याच्या फलके यांच्या प्रवृत्तीमुळे ते माध्यमाच्या कायम चर्चेत असतात.

सातत्याने विविध सामाजिक उपक्रम राबवुन शेवगावकरांचे लक्ष वेधून घेणारे, ग्रामिण भागात बुक फेस्टिवल, पुस्तक प्रदर्शन करून वाचन, संस्कृति जोपासणे, सिड बँक, सार्वजनिक ठिकाणी, शेणाच्या गोळ्यात, विविध वृक्षांच्या बिया घालून नैसर्गिक वृक्षारोपण, स्पर्धा परीक्षासाठी गरजु विद्यार्थ्यांसाठी ग्रंथ उपलब्ध करणे, अभ्यासिका चालवणे, त्यांच्यासाठी मार्गदर्शक व्याख्याने आयोजीत करणे, गुणवंत विद्यार्थ्यांचा यथोचित सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देणे आदी उपक्रम ते सातत्याने राबवित असतात.

कोरोना काळात आणि त्या नंतरही अनेकांच्या आजारपणात त्यांनी अर्ध्या रात्री मदतीचा हात देत देवदुताचे काम केले. म्हणूनच वाढदिवस डामडौल न करता केला, तरी त्यांना शुभेच्छा देणाऱ्याची दिवसभर गर्दी होती.

आपला व्यवसाय सांभाळून समाजकारणाला प्राधान्य देणारा ध्येयवेडा तरुण शहरातील मोजक्या आदर्श राजकारण्यांपैकी एक टक्केवारी पासून चार हात दूर असणारा आणि माजी आमदार स्वर्गीय राजाभाऊ राजळे यांचे विश्वासू सहकारी तसेच आमदार मोनिकाताई राजळे यांचे सल्लागार म्हणून त्यांची वेगळी ओळख आहे.