अर्थसंकल्पात २५.५० कोटी निधीस मंजुरी – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढतांना मतदारसंघातील बहुतांश रस्त्यांचा प्रश्न सोडविला असून उर्वरित रस्त्यांसाठी देखील निधी मिळावा यासाठी दाखल केलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावास २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात २५.५० कोटी निधीस मंजुरी मिळाली असल्याची माहिती आ.आशुतोष काळे यांनी दिली आहे.

आमदार आशुतोष काळे यांनी मतदार संघाच्या ग्रामीण भागातील अनेक रस्त्यांना निधी मिळावा याबाबत सातत्याने शासनाकडे पाठपुरावा केला आहे. या पाठपुराव्याला यश लाभले असून २०२३-२४ च्या अर्थसंकल्पात रस्त्यांसाठी २५.५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे निश्चितच या रस्त्यांसाठी आता निधीची उपलब्धता झाली असल्याने लवकरच निविदा प्रक्रिया पूर्ण होवून प्रत्यक्षात कामाला सुरुवात होणार आहे.

या २५.५० कोटी निधीतून कोपरगाव तालुक्यातील या रस्त्यांचा विकास होणार आहे. यामध्ये रा.मा.६५ अंजनापुर ते रांजणगाव देशमुख रस्ता (०५ कोटी), चास-वडगाव-बक्तरपुर जिल्हा हद्द रस्ता (प्र.जि.मा.०८) रा.मा. ६५ (कोपरगाव ते धारणगाव रस्ता) सुधारणा करणे (०४ कोटी), रा. मा.०७ धामोरी, येसगाव रस्ता (प्र.जि.मा.०४) येसगाव-खिर्डी गणेश-बोलकी रस्ता सुधारणा करणे (०४ कोटी), बक्तरपुर जिल्हा हद्द रस्ता (प्र.जि.मा.०८) (मंजूर गाव ते बक्तरपुर रस्ता) सुधारणा करणे (२.५० कोटी), 

रा.मा. ७ रस्ता (प्रजिमा ८५) सा. क्र.०/५०० मध्ये कुंभारी येथील गोदावरी नदीवरील मोठ्या पुलाची दुरुस्ती करणे (०३ कोटी),उक्कडगाव रस्ता रा.मा.६५ (करंजी फाटा ते कॅनॉल पर्यंत रस्ता) मध्ये सुधारणा करणे (२.५० कोटी), रा.म.मा.५० (रा.मा.३६) शिंगवे ते बनकर वस्ती रस्ता सुधारणा करणे (२.५० कोटी), रामपूर वाडी ते पुणतांबा रस्ता (प्रजिमा ८७) मध्ये सुधारणा करणे (०२ कोटी) या रस्त्यांचा सामावेश आहे.

आ.आशुतोष काळेंच्या माध्यमातून वारंवार केलेल्या पाठपुराव्यातून कोपरगाव मतदार संघातील या मंजूर झालेल्या निधीतून आता तालुक्यातील अनेक महत्वाच्या रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहेत. त्यामुळे मागील काही वर्षांपासून खराब रस्त्यांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार असून या रस्त्याने नियमितपणे ये जा करणाऱ्या वाहनचालकांची डोकेदुखी दूर होवून नागरिकांचा प्रवास आता सुखकर होणार असल्यामुळे त्यांनी आ.आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.