शेवगाव प्रतिनिधी, दि. ५ : औरंगाबाद बारामती राज्य मार्गालगत हजारो वनराईने नटलेल्या गर्द हिरवाईत विविध वास्तूंनी गजबजलेल्या श्री क्षेत्र अमरापूरच्या श्री रेणुका माता देवस्थानाच्या वैभवात नुकतीच आणखी भर पडली आहे. येथे दहा हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या तीन मजली भक्त निवासाची आणि भव्य प्रसादालयाच्या भव्य वास्तूची नुकतीच उभारणी झाली आहे. या भव्य वास्तूचा लोकार्पण सोहळा तारकेश्वर गडाचे महंत शांती ब्रह्म आदिनाथ महाराज शास्त्री यांचे हस्ते संपन्न होऊन हनुमान टाकळीचे महंत रमेश आप्पा महाराज आणि हजारो मान्यवरांच्या उपस्थितीत भाविक भक्तासाठी ते नुकतेच खुले करण्यात आले.
श्री क्षेत्र माहूर येथील ज्येष्ठ पुजारी रविंद्र काण्णव , मनोज बनसोड, संदीप काण्णव, पाथर्डीचे वे.शा.सं. सचिन देवा , देवस्थानचे पुजारी तुषार देवा आणि अकरा ब्रह्म वृद्धांनी पौरहित्य केले. माजी प्राचार्य श्री व सौ. चंद्रकांत गळगट्टे यांचे हस्ते पूजा करण्यात आली.
यावेळी आमदार मोनिकाताई राजळे, रेणुका भक्त मंगलताई भालेराव, माजी सहकार आयुक्त श्री व सौ बी. डी.पवार, हवेलीचे अण्णा महाडिक, मराठा आरक्षण समन्वय समिती व फूड कारपोरेशन ऑफ इंडियाचे सदस्य योगेश केदार , लोकमतचे संपादक सुधीर लंके, नरेंद्र अंकूश, आनंद (गुजराथ ) येथील सीए श्री व सौ. जिग्नेशभाई, पुण्याचे अॅड श्री व सौ. महाजन, श्री बजाज नक्षत्र ग्रुप मुंबई, श्री यादव नवी दिल्ली, जयंती भालेराव, मनिषा भालेराव ,पाथर्डीचे प्रथम नगराध्यक्ष सुभाष घोडके, माजी नगराध्यक्ष जनाबाई घोडके, कोपरगाव दै. प्रभातचे प्रतिनिधी शंकरराव दुपारगुडे, हिंदू रक्षा युवा मंच पदाधिकारी,
बबनराव भुसारी, अंबादास कळमकर, विष्णुपंत भालेराव, अॅड. नितीन भालेराव, चंद्रकांत मनवेलीकर, डॉ. श्री व सौ. संजय लड्डा, डॉ . श्री व सौभाऊसाहेब लांडे पाटील, शिवसेनेचे रामदास गोल्हार, श्रीमंत घुले, प्रा. जनार्दन लांडे पाटील, अनिल साठे, सचिन सातपुते, शाम पुरोहीत, अलीम शेख, राजू घुगरे, आदिसह पंचक्रोशीतील विविध क्षेत्रातील हजारो नागरिकांनी याप्रसंगी भेट देऊन या उपक्रमाचे मुक्त कंठाने स्वागत केले.
श्री रेणुका माता देवस्थानचा लौकिक आता राज्यातच नव्हे तर परराज्यासह सातासमुद्रापार परदेशापर्यंत पोहोचला आहे . तेथील भाविक देखील येथे नियमित हजेरी लावत असतात. देवस्थानाभोवती वाढलेल्या हजारो उंचच उंच वृक्षराईने हे स्थळ एखाद्या पर्यटनस्थळा पेक्षाही रमणीय झाले आहे. त्यामुळे अनेक भाविक येथे वास्तव्य करत असत. मात्र अगोदरची व्यवस्था कमी पडू लागल्याने देवस्थानचे प्रमुख ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉ. प्रशांत भालेराव यांनी या नवीन वास्तूच्या उभारणीचा निर्णय घेतला.
आता नेहमी येणाऱ्या भाविकांच्या निवासाची तसेच नवरात्रात घटी बसणाऱ्या महिलांची मोठी सोय झाली आहे. तसेच रोजच्या आणि दर पौर्णिमेला मोठ्या प्रमाणात होणाऱ्या भंडाऱ्याच्या प्रसादाची सोय झाली आहे. परिसरात स्वच्छ आणि शुद्ध पिण्याच्या पाण्यासाठी एक्वागार्डची तसेच स्वतंत्र स्वच्छतागृहाची उभारणी करण्यात आली आहे.