डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून ८ तास वाचन उपक्रमाचे आयोजन

शेवगाव प्रतिनिधी, दि.१२ :  येथील न्यू आर्टस् महाविदयालयातील ग्रंथालय विभागात भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंतीचे औचित्य साधून त्यांच्या वाचनाच्या व्यासंगी वृत्तीला अभिवादन म्हणून शुक्रवारी (दि.१२) विदयार्थ्यांसाठी ८ तास वाचन, अभ्यास उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.

महाविदयालयाचे प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे यांनी उपक्रमाचे उद्घाटन केले. यावेळी ग्रंथपाल प्रा. मिनाक्षी चक्रे यानी या उपक्रमात विदयार्थांना वाचन करण्यासाठी कथा, कादंबरी, नाटक, प्रवास वर्णन, चरित्र आत्मचरित्र, प्रेरणात्मक, मनोरंजनात्मक, अभ्यासक्रमाचे, विषयानुसार संदर्भ असे ग्रंथ त्यांच्या आवडीनुसार देण्यात आले.

वाचन संस्कृती वृद्धिगत होण्यासाठी व वाचनाची आवड निर्माण होण्यासाठी अशा उपक्रमची गरज असते. नवीन शैक्षणिक धोरण २०२० मध्ये वाचन संस्कृतीचा विकास करणे यावर भर दिलेला आहे. अशी माहिती दिली. प्राचार्य कुंदे यांनीही मार्ग दर्शन केले. या उप्रमात शंभर विदयार्थ्यांनी सक्रीय सहभाग घेतला. त्यासाठी बाळासाहेब आठरे, नंदू बर्डे, मोनिका काकडे यांनी योगदान दिले.