शिरीष व वंदना भारदे यांनी केली नर्मदा परिक्रमा पूर्ण

शेवगाव प्रतिनिधी, दि.१२ :  येथील सामाजिक कार्यकर्ते तथा दत्त भक्त दाम्पत्य शिरीष व वंदना भारदे या दाम्पत्याने तब्बल १२९ दिवसात खडत अशी तीन हजार ६०० किलो मिटर अंतराची नर्मदा परिक्रमा पायी पूर्ण केली आहे. या उपक्रमा बद्दल त्यांचे ठिकठिकाणी स्वागत होत आहे.

भारदे दाम्पत्याने २९ नोव्हेंबर २०२३ ला श्री क्षेत्र ओंकारेश्वर हून या पायी परिक्रमेला सुरुवात केली होती. तर ६ एप्रिल २०२४ ला ते परत तेथे आले. या चार महिने ८ दिवसाचा पायी प्रवास पूर्ण करून श्रीदत्तगुरू व माई नर्मदा यांच्या कृपेने यथासांग अनेक पौराणिक दृष्ट्या धार्मिक संदर्भ असलेल्या ठिकाणी पूजा, अभिषेक, कन्या भोजन, थोर संत महात्मे, विभूति, तपस्वी यांचे दर्शन व आशीर्वाद घेऊन पूर्ण करून सुखरूप परतले आहेत.

या परिक्रमेमुळे भारदे दांपत्यामध्ये अमुलाग्र बदल झाला आहे. या पुढील आपले आयुष्य श्रीदत्त गुरूंच्या सेवेत आणि नर्मदा माईच्या सेवेत घालविणार आहोत असल्याचे, ज्याच्या त्याच्या कर्माची जबाबदारी ज्याच्या त्याच्यावर टाकून आम्ही नर्मदा माई सारखं वाहत राहण्याचे निश्चित केले आहे.

अशी भावना त्यांनी व्यक्त करून आजच्या धकाधकीच्या आणि तणावपूर्ण जीवनामध्ये आपल्या जवळ देवधर्म करायला वेळ आणि पैसा नाही. परंतु तन-मन धनाने नर्मदा परिक्रमा पूर्ण केल्यावर जे आत्मिक आणि मानसिक समाधान मिळते. त्याचा लाभ ज्याला जमेल तसा त्याने निश्चित घ्यावा. असे आवाहन भारदे यांनी शेवटी केले.