कोपरगांव प्रतिनिधी, दि. २० : संजीवनी युनिव्हर्सिटीच्या स्कूल ऑफ इंजिनिअरींग अँड टेक्नाॅलाॅजी मधिल आर्टीफिशियल इंटीलिजन्स अँड मशीन लर्निग (एआयएमएल) विभागातील दोन टिमने कोयंबतुर (तामिळनाडू) येथे नुकत्याच संपन्न झालेल्या आयबीएम नॅशनल हॅकाथॉन २०२६ या अभियांत्रिकी विध्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आलेला राष्ट्रीय स्पर्धेत सहभाग नोंदवुन देशातील सुमारे ४०० टीम मधुन पहिल्या सर्वोत्कृष्ट १० टीम मध्ये स्थान मिळविलेे.

संजीवनी युनिव्हर्सिटी जरी ग्रामीण भागात असली तरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आघाडीवर असल्याचे सिध्द केले. दोनही टीमच्या दोनही प्रोजेक्टवर पुढील संशोधन करण्यासाठी आयबीएम प्रत्येकी रू ५ लाखांचे अर्थ सहाय्य देण्याचे नमुद केले आहे.

आयबीएम नॅशनल हॅकाथॉन या स्पर्धेत विद्यार्थी वास्तविक उद्योग क्षेत्रातील आव्हानांवर नाविन्यपूर्ण कल्पना आणि सहकार्याच्या माध्यमातून उपाय शोधतात आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानांचा प्रत्यक्ष परिचय पंचासमोर सादर करतात. प्रथम उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांकडून विविध वास्तविक समस्यांची यादी दिली जाते.

या स्पर्धेत नेहा संजय चव्हाण, पायल सतीश गायकवाड, ओंकार दत्तात्रय वाकचौरे व अपर्णा प्रकाश मतसागर यांच्या टीमने ‘सायबर सिक्युरिटी’ या समस्येवर सादरीकरण दिले तर दिगंबर अर्जुन महाजन, रोहित संदीप तुपे, अजित देविदास नवले व आदित्य संतोश गांगुर्डे यांच्या टीमने ‘ रोड सेफ्टी इन इंडिया’ या समस्येवर सादरीकरण दिले. परीक्षकांनी नावीण्यपूर्ण कल्पना, तांत्रिक गुणवत्ता, समस्या सोडविण्याची क्षमता, व्यावहारीक उपयोगीता आणि सादरीकरण कौशल्य या निकषांवर आधारीत दोनही टीमला देशातील पहिल्या दहा टीममध्ये निवड केली. या विध्यार्थ्यांना प्रा. सौहरद्या गायेन व प्रा. शिवानी पामु यांनी मार्गदर्शन केले.

संजीवनी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी आयबीएम नॅशनल हॅकाथॉन २०२६ सारख्या राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित स्पर्धेत देशातील अव्वल दहा संघांमध्ये स्थान मिळवून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची गुणवत्ता, कल्पकता आणि जागतिक स्तरावरील स्पर्धात्मक क्षमता सिद्ध केली आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, सायबर सुरक्षा आणि सामाजिक समस्यांवरील तंत्रज्ञानाधारित उपाययोजनांच्या माध्यमातून त्यांनी नवोन्मेशाचा नवा आदर्श निर्माण केला आहे. हे केवळ विद्यार्थ्यांचे यश नसून संजीवनीच्या गुणवत्तापूर्ण शिक्षण, उद्योगाभिमुख अभ्यासक्रम आणि संशोधन संस्कृतीची राष्ट्रीय पातळीवरील पोचपावती आहे. ग्रामीण विध्यार्थ्यांना जागतिक संधी उपलब्ध करून देणे आणि ‘रूरल टू ग्लोबल’ हे स्वप्न साकार करणे, हीच संजीवनीची भूमिका आहे. भविष्यातही संजीवनीचे विद्यार्थी ज्ञान, संशोधन आणि नवोन्मेशाच्या बळावर देशाच्या तंत्रज्ञान प्रगतीत मोलाचे योगदान देतील, असा मला विश्वास आहे. – अमित कोल्हे, प्रसिडेंट, संजीवनी युनिव्हर्सिटी

संजीवनीचे अध्यक्ष नितिनदादा कोल्हे यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तर प्रेसिडेंट अमित कोल्हे यांनी सर्व विद्यार्थ्यांचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी व्हाईस चांसलर डाॅ. ए.जी. ठाकुर, डीन डाॅ.कविथा राणी, विभाग प्रमुख डाॅ. देवयानी जाधव, प्रा. सौहरद्या गायेन व प्रा. शिवानी पामु उपस्थित होते.


