नगरपालिकेने पूर्वीप्रमाणे ३ दिवसाआड पाणी पुरवठा पूर्ववत करावा – मंगेश पाटील

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १० : मागील दीड महिन्यापूर्वी नगरपालिकेने अचानक २८ नोव्हेंबरला पाणी आठवड्यातून एक दिवस म्हणजे ७ दिवसांनी पाणी देणार असे जाहीर केले. नागरिक विशेष करून महिला वर्ग खूप नाराज झाला. ख्रिसमस सन व मुलांना सुट्ट्या होत्या. नगरपालिकेने अचाणक पाणी दिवस पाटबंधारे विभाग यांनी कॅनॉलचे काम काढल्याचे सांगून पाणी दिवस वाढवले. यामुळे महिला वर्गाची खूप धावपळ झाली, त्यांना त्रास झाला. ऐकीकडे धरणे भरलेली असताना व नदीला पाणी असताना कोपरगावकरांना आठवड्यातून १ दिवस पाणी करण्यात आले, ही खेदाची गोष्ट आहे. 

आत्ता कॅनॉलला पाणी आले असून नगरपालिकेने सर्वे साठवन तळे पूर्ण क्षमतेने आत्ताच सुरवातीला व परत कॅनॉल बंद होताना लक्ष ठेऊन, काळजीने व जबाबदारीने  भरून घ्यावे.जेणेकरून नागरिकांना येणाऱ्या काळात त्रास होणार नाही. त्यांची घैरसोय होणार नाही. कारण नगरपालिकेचा पाणी मंजूर कोठ्या पेक्षा नगरपालिका पाणी कमी घेते, कारण साठवण तळे गाळानी भरले असून, त्याची साठवण क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे कॅनॉल सुटल्यावर व बंद होताना दोन्ही वेळा भरून घ्वावां, कारण आपल्याला आपल्या हक्काचे पिण्याचे पाणी मंजूर आहे आणि त्याची पट्टी नगरपालिका शासनाला पाटबंधारे विभागाला जनतेच्या कररुपी भरलेल्या पैशातून देते. 

तरी नगरपालिकेनी पूर्वी प्रमाने 3 दिवसाआड म्हणजे चौथ्या दिवशी पाणी पुरवठा तात्काळ करून नागरिकांना दिलासा द्यावा. ही नगरपालिका प्रशासनाला मागणी व विनंती. जसे हक्कानी पाणी पट्टी वसूल करता व पाटबंधारे विभाग यांचे सुचणे नुसार पाणी दिवस तात्काळ वाढवतात ,तसे खरे तर जनतेनी  मागणी न करता पाणी कॅनॉल ला आल्यावर पूर्वी प्रमाने लगेच मागणी करायला न लावता नगरपालिकेने स्वतः हुन पाणी दिवस कमी करायला पाहिजे होते.