कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : कोपरगाव मतदार संघातील ग्रामीण भागाच्या महत्वाच्या रस्त्यांना निधी मिळावा यासाठी केलेल्या पाठपुराव्यातून मतदार संघाच्या विकासासाठी अजून एक पाऊल पुढे टाकला असून लेखाशीर्ष २५१५-१२३८ अंतर्गत तब्बल ५२ रस्त्यांना १० कोटी निधी मंजूर करण्यात यश मिळविले असल्याची माहिती आ. आशुतोष काळे यांनी दिली आहे.
कोपरगाव मतदार संघाच्या रस्ते विकासाचा अनुशेष भरून काढतांना आ. आशुतोष काळे यांनी मतदार संघातील दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या अनेक रस्त्यांसाठी निधी दिल्यामुळे बहुतांश रस्ते विकसित होवून नागरिकांच्या अडचणी सुटल्या आहेत. परंतु मतदार संघाच्या सर्वच रखडलेल्या रस्त्यांचा विकास करून रस्त्यांसाठी जास्तीत जास्त निधी कसा मिळविता येईल यासाठी त्यांचा सातत्याने शासन दरबारी पाठपुरावा सुरु असतो. त्या पाठपुराव्यातून पुन्हा एकदा ५२ रस्त्यांचे भाग्य उजाळले असून या रस्त्यांसाठी १० कोटी निधी मिळविण्यात आ. आशुतोष आले यांना यश आले आहे.
या रस्त्यांमध्ये जेऊर पाटोदा येथील सखाराम आव्हाड (गुरुजी) घर ते माधव केकाण घर (इजिमा १६०मिळणारा रस्ता) खडीकरण करणे. (२० लक्ष), कोळपेवाडी माहेगांव देशमुख शिव ते मारुती भगवंता काळे वस्ती (चर रस्ता) रस्ता खडीकरण करणे (१५ लक्ष), माहेगांव देशमुख एमडीआर ८५ (मारुती मंदिर) बाबासाहेब पानगव्हाणे घर ते ज्ञानेश्वर खैरनार वस्ती रस्ता डांबरीकरण करणे. (५० लक्ष),माहेगाव देशमुख एम. डी. आर. ८५ (मारुती मंदिर) बाबासाहेब पानगव्हाणे घर ते ज्ञानेश्वर खैरनार वस्ती रस्त्यावर भिकन सय्यद पाण्याची टाकी जवळील चरावर सी.डी. वर्क करणे (१० लक्ष), कुंभारी सोमनाथ दिघे वस्ती ते रावसाहेब बढे वस्ती रस्ता खडीकरण करणे (१० लक्ष),
धारणगांव आण्णासाहेब वहाडणे घर ते बाबुराव जाधव घर रस्ता डांबरीकरण करणे (१५ लक्ष), धारणगाव बाबासाहेब चौधरी घर ते मंगेश जिरे घर रस्ता डांबरीकरण करणे(१५ लक्ष),जेऊर पाटोदा इजिमा १६० ईशान्यनगर ते ज्ञानेश्वर बाचकर घर रस्ता डांबरीकरण करणे(३० लक्ष),येसगांव नगर-मनमाड हायवे ते जुना पाट ब्राम्हणगांव रोड रस्ता डांबरीकरण करणे(३० लक्ष), बोलकी खिर्डी गणेश शिवरस्ता २७ चारी डॉ. डांबरे घर ते रेल्वे चौकी बाबासाहेब चांदर घर रस्ता खडीकरण करणे (३० लक्ष),पढेगांव दिपक पवार गिरणी ते ४५ चारी जि.प.प्राथमिक शाळा रस्ता डांबरीकरण करणे(२० लक्ष), येसगांव नगर मनमाड रोड ते राजेंद्र निकोले घर रस्ता खडीकरण व डांबरीकरण करणे(१० लक्ष), नाटेगांव प्रभाकर मोरे घर ते मोहन वस्ती रस्ता नाटेगांव बदापूर रोड डांबरीकरण करणे(१० लक्ष), शिंगणापूर २८ चारी मच्छिंद्र तुकाराम संवत्सरकर घर ते सोमनाथ कुऱ्हे घर रस्ता खडीकरण करणे(२० लक्ष), उक्कडगांव तळेगांव कैलास कारभारी निकम घर ते गोपीनाथ शंकर लोहकरे घर रस्ता खडीकरण करणे(२५ लक्ष),
खिर्डी गणेश २७ चारी बाबासाहेब माधव चांदर घर ते चांगदेव रामनाथ हिरे घर शिंगणापूर रोड रस्ता खडीकरण करणे (१५ लक्ष), वाकडी श्री स्वामी समर्थ मंदिर ते नारायण खरात घर रस्ता डांबरीकरण करणे(२० लक्ष),शिंगवे कोपरगांव पुणतांबा रोड ते पद्माकर सुराळकर घर रस्ता रस्ता डांबरीकरण करणे(२० लक्ष), वाकडी श्री संत सावता महाराज मंदिर पेव्हर ब्लॉक बसविणे (१५ लक्ष), पुणतांबा रेल्वे फाटक ते श्री चांगदेव महाराज मंदिर कमान रस्ता डांबरीकरण करणे(२० लक्ष), जळगांव सुरेश नाना चौधरी घर ते चंद्रमान बाबुराव चौधरी रस्ता डांबरीकरण करणे(१० लक्ष), शिंगवे पिंपळवाडी रोड ते बाळासाहेब बाभूळके घर रस्ता खडीकरण करणे (१० लक्ष), रामपूरवाडी डॉ. प्रदीप उगले घर ते बबन सोनवणे घर रस्ता खडीकरण करणे (१० लक्ष), कान्हेगांव लक्ष्मण चौधरी वस्ती ते गोरख विंचू रस्ता खडीकरण करणे (२० लक्ष), संवत्सर पढेगांव चौकी ते कासली चौकी रस्ता खडीकरण करणे (१५ लक्ष), वारी गोरख मोरे घर ते भगवान मोरे घर रस्ता खडीकरण करणे (१० लक्ष),वारी रेल्वे गेट ते मलिक घर (बापतरा रोड) रस्ता खडीकरण करणे (१० लक्ष), भोजडे प्रजिमा १३ ते भोकरे वाबळे वस्ती रस्ता खडीकरण करणे (१० लक्ष),
तळेगांव मळे ते भोजडे रस्ता खडीकरण करणे (१० लक्ष), दहेगांव बोलका गुलाबराव वाघ घर ते संवत्सर बिग बागायतदार सोसायटी ते चंद्रशेखर देशमुख वस्ती रस्ता डांबरीकरण करणे (४० लक्ष), खोपडी बाळासाहेब वारकर घर ते आण्णासाहेब जाधव घर रस्ता रस्ता खडीकरण करणे (१० लक्ष), संवत्सर कासली रोड ते विठ्ठल भाकरे वस्ती रस्ता खडीकरण करणे(१५ लक्ष), धोत्रे श्री संत सावता महाराज मंदिर सभामंडप बांधणे (१० लक्ष), भोजडे सभागृह बांधणे (१० लक्ष), डांगेवाडी रोड माथा ते जालिंदर कांडेकर घर १.५ किमी रस्ता डांबरीकरण करणे (४० लक्ष), रांजणगाव देशमुख खंडोबा मंदिर ते संदीप गोर्ड घर १ किमी रस्ता डांबरीकरण करणे(२५ लक्ष), डाऊच खुर्द महालक्ष्मी डेअरी ते रावसाहेब पवार घर १ किमी रस्ता डांबरीकरण करणे (२५ लक्ष), धोंडेवाडी पंचवटी हॉटेल ते थेटे वस्ती रस्ता बहादरपूर जवळके रोड १ किमी रस्ता डांबरीकरण करणे (२० लक्ष), चांदेकसारे आबा दाजीबा होन घर ते राजू शेख घर रस्ता डांबरीकरण करणे (२५ लक्ष), सोनेवाडी २९ नाला ते बापु होन घर रस्ता डांबरीकरण करणे (२५ लक्ष), मळेगांव थडी गाव कमान ते गोदावरी नदी पर्यंत रस्ता डांबरीकरण करणे (२० लक्ष), मायगांव देवी इजिमा ४ मायगांव चौफुली ते मायगांव देवी गांव रस्ता डांबरीकरण करणे (५० लक्ष), वेळापूर मंगेश पाटील शेती ते गोदावरी नदी पर्यंत रस्ता खडीकरण करणे (१० लक्ष),
धामोरी इजिमा ४ ते गांव कमान ग्रामा १ रस्ता डांबरीकरण करणे (१० लक्ष), धामोरी ग्रामा १ जोड रस्ता ते मांजरे वस्ती शाळा रस्ता खडीकरण करणे (१० लक्ष),रवंदे इजिमा ४ चारी नंबर ५ ते कनॉल पर्यंत रस्ता खडीकरण करणे (२० लक्ष), सुरेगांव ग्रामा २८ पिजेएसएस शाळा ते कोळगांव थडी रस्ता डांबरीकरण करणे (१० लक्ष) चासनळी इजिमा-८ ते बाबासाहेब चांदगुडे घर रस्ता डांबरीकरण करणे (२० लक्ष), शहाजापूर शिवाजी काकडे घर ते वर्पे वस्ती ग्रामा १०१ ला मिळणारा रस्ता डांबरीकरण करणे (१५ लक्ष),करंजी म्हसोबा मंदिर ते जुना कॅनॉल पर्यंत रस्ता रस्ता डांबरीकरण करणे (२० लक्ष), दहेगांव बोलका अनिल वल्टे वस्ती ते सुनिल सरोदे वस्ती रस्ता डांबरीकरण करणे (४० लक्ष), जेऊर कुंभारी धनंजय रोहम घर ते दिलीप शिंदे घर १ किमी रस्ता डांबरीकरण करणे (२५ लक्ष) या रस्त्यांचा समावेश आहे.
मागील अनेक वर्षापासून या रस्त्यांचा विकास व्हावा अशी या गावातील नागरिकांची मागणी होती. त्या मागणीची दखल घेवून आ. आशुतोष काळे यांनी या रस्त्यांना निधी दिल्यामुळे या रस्त्यांचा विकास होवून नागरिकांच्या अडचणी सम्पुष्टात येणार आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांनी आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे. महायुती सरकारने रस्त्यांसाठी १० कोटी निधी मंजूर केल्याबद्दल आ. आशुतोष काळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांचे मतदार संघातील जनतेच्या वतीने आभार मानले आहे.