आमदार काळेंमुळे अयोध्यानगरचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला – सचिन गवारे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : कोपरगाव शहरातील अयोध्या नगर मध्ये मागील अनेक वर्षापासून पिण्याच्या पाण्याची अडचण होती. त्याबाबतच्या अडचणी दूर करण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी पुढाकार घेतल्यामुळे मागील अनेक वर्षापासूनचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला असल्याची माहिती राष्ट्रवादीचे पदाधिकारी सचिन गवारे यांनी सांगितले.  

     कोपरगाव शहराचा पाणी प्रश्न सोडविण्यासाठी आ. आशुतोष काळे यांनी १३१.२४ कोटीची निधी दिला आहे. या योजनेमध्ये ५ नंबर साठवण तलावासह कोपरगाव शहरात वितरण व्यवस्थेचे काम प्रगती पथावर आहे. शहरातील अयोध्या नगरमध्ये मागील अनेक वर्षापासून नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यात अडचणी येत असल्यामुळे स्वतंत्र पाईप लाईन टाकणे गरजेचे होते. त्याबाबत आ.आशुतोष काळे यांनी हा प्रश्न सोडविण्यासाठी अयोध्या नगरमध्ये स्वतंत्र पाईप लाईन टाकण्याच्या सूचना कोपरगाव नगरपरिषदेला दिल्या होत्या.

पाईप लाईनचे काम पूर्ण झाल्यानंतर कोपरगाव नगरपरिषदेकडे नागरिकांना या पाईप लाईनवर नळ कनेक्शन द्यावे यासाठी आ.आशुतोष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन गवारे, संदीप कपिले यांनी पाठपुरावा करून नागरिकांना नळ कनेक्शन मिळवून दिले. त्यामुळे अयोध्या नगरच्या नागरिकांना पाणी मिळणे सुरु झाले आहे.

हा प्रश्न कित्येक वर्षापासून प्रलंबित होता या प्रश्नाचे गांभीर्य ओळखून आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव नगरपरिषदेला याबाबत तातडीने कार्यवाही करण्यास भाग पाडले त्यामुळे  अयोध्या नगरमध्ये स्वतंत्र पाईप लाईन टाकण्यात आल्यामुळे नागरिकांचा अत्यंत जिव्हाळ्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आ. आशुतोष काळेंच्या पुढाकारातून कायमचा सुटला असल्याचे सचिन गवारे यांनी सांगितले आहे.