शेवगाव ग्रामीण रुग्णालयात महाआरोग्य शिबिराचे आयोजन

शेवगाव प्रतिनिधी, दि ७ : येथील ग्रामीण रुग्णालयात गुरुवार दि.९ फेब्रुवारीला  सर्व रोग महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले असून या संधीचा जास्तीत जास्त जणांनी लाभ घ्यावा असे आवाहन ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.रामेश्वर काटे यांनी केले आहे.

      सर्व रोग महाआरोग्य शिबिरात हृदयरोगतज्ज्ञ व मधुमेह तज्ञ, बालरोग तज्ञ , स्त्रीरोगतज्ज्ञ, त्वचारोग तज्ञ, नेत्र रोग तज्ञ, मानसोपचार तज्ञ, क्ष-किरण तज्ञ उपस्थित राहून रुग्णांची तपासणी करणार आहेत. तसेच यावेळी  रक्तदान शिबिराचे  देखील आयोजन करण्यात आले आहे.

     शिबिराचा शुभारंभ आमदार मोनिकाताई राजळे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असून यावेळी करोना लसिकरण करण्यात येणार आहे. आयुष्यमान भारत योजनेचे कार्ड संबधितांना देण्यात येणार असल्याची माहिती डॉ. काटे यांनी दिली.