सावित्रीबाईंच्या प्रगतशील विचारानेच महाराष्ट्र विकासाच्या वाटे वर – प्रा. डॉ. सुनिता मोटे

शेवगाव प्रतिनिधी, दि.०३ : समाजकार्याचा वसा सावित्रीबाईंनी ज्योतीबांच्या साथीने पुढे नेऊन समताधिष्टीत समाज निर्माण करण्याचा प्रयत्न केला.  सावित्रीबाईंच्या प्रगतशील विचारानेच आज महाराष्ट्र विकासाच्या वाटे वर मार्गक्रमण करत असून स्त्रीयांनी व्रत वैकल्यात अडकण्यापेक्षा ज्ञान ज्योतीचा प्रकाश सर्व स्त्रीयापर्यंत पोहचविण्यासाठी प्रयत्न करावा. समाजात जे अशिक्षित आहेत, आडाणी आहेत अशा तळागाळातील व्यक्ती पर्यंत ज्ञानगंगोत्री  पोहचवण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन प्रा. डॉ. सुनिता मोटे यांनी केले.

येथील न्यू आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयात ग्रंथालय विभागाच्या वतीने स्त्री शिक्षणाच्या पुरस्कर्त्या, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १९३ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात नगरच्या न्यू आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयातील प्रा. डॉ. सुनिता मोटे बोलत होत्या.

प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे अध्यक्ष स्थानी होते. यावेळी उपप्राचार्य डॉ. युवराज सुडके, डॉ. छाया भालशंकर, अध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते. प्रा. डॉ. अनिता आढाव यांनी प्रास्ताविक केले. स्वाती देवढे हिने सुत्रसंचलन केले. तर प्रा. मिनाक्षी चक्रे यांनी आभार मानले.