समता दिनदर्शिका आम्हा सर्वांची दैनंदिनी – डॉ. यशराज महानुभाव

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २५ : ‘समता पतसंस्थेने आर्थिक क्षेत्रात सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. संस्थेचे कर्मचारी सभासदांना आदरपूर्वक सेवा देत असतात. समताने सहकार क्षेत्रात एक प्रतिष्ठा निर्माण केली आहे. समता प्रत्येक वयोगटातील सभासदांसाठी विविध योजना आणि उपक्रम राबवत असते. या सर्व सुविधा आणि उपक्रम हे स्तुत्य स्वरूपाचे आहेत. समताचा हा उपक्रमदेखील आमच्यासाठी महत्त्वपूर्ण असून, आम्हा सर्वांची दैनंदिनी असल्याचे आम्ही समजतो,’ असे प्रतिपादन कोपरगाव तालुक्यातील महानुभाव संप्रदायाचे आचार्य डॉ. यशराज महानुभाव यांनी केले.

समता नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्व. मोहनलाल आनंदराम झंवर सभागृहात गुरुवारी कोपरगाव शहरातील वैद्यकीय क्षेत्रातील प्रसिद्ध डॉ. नरेंद्र भट्टड, बबलू वाणी, कान्हेगाव येथील संस्थेचे ज्येष्ठ ठेवीदार किसन सांगळे, संस्थेचे ज्येष्ठ संचालक अरविंद पटेल, चांगदेव शिरोडे, संदीप कोयटे, गुलशन होडे यांच्या उपस्थितीत समता दिनदर्शिका २०२३ चे प्रकाशन झाले. डॉ. महानुभाव यांचा सत्कार संस्थेचे ज्येष्ठ संचालक अरविंद पटेल यांच्या हस्ते, डॉ. नरेंद्र भट्टड यांचा सत्कार संदीप कोयटे यांच्या हस्ते, बबलू वाणी यांचा सत्कार चांगदेव शिरोडे यांच्या हस्ते, तर ठेवीदार किसन सांगळे यांचा सत्कार गुलशन होडे यांच्या हस्ते करण्यात आला. 

संदीप कोयटे यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, ‘समता दरवर्षी सभासदांसाठी समता दिनदर्शिकेची छपाई करून कोपरगाव शहरातील सभासद, सरकारी कार्यालये आणि हितचिंतकांपर्यंत घरपोच देत असते. सभासदही समता दिनदर्शिकेची आतुरतेने वाट पाहत असतात.’ ज्येष्ठ संचालक अरविंद पटेल म्हणाले, ‘समताच्या ठेवी ७३० कोटी रुपयांवर पोहोचल्या असून, कर्ज वाटप ५५८ कोटी इतके आहे. त्यात २२५ कोटी रुपयांचे सोनेतारण कर्ज असून, संस्थेची गुंतवणूक १९० कोटी इतकी आहे. संस्थेच्या ९९.६१ टक्के ठेवीदारांच्या ठेवी समता लिक्विडिटी बेस्ड प्रोटेक्शन फंड स्कीमनुसार अतिशय सुरक्षित आहेत. समता ग्राहकांना अत्याधुनिक बँकिंगद्वारे तत्पर सेवा पुरविण्यात महाराष्ट्रात अग्रेसर आहे. ज्येष्ठ नागरिकांना घरपोच सेवादेखील पुरवत असते.’

डॉ. नरेंद्र भट्टड म्हणाले, समताचे चेअरमन काका कोयटे यांच्या मार्गदर्शनाखाली समता पतसंस्थेने सर्व सभासदांचा विश्वास संपादन केला आहे. समताच्या सर्वच सभासदांच्या ठेवींना सुरक्षितता प्रदान करण्याचे काम समता पतसंस्था करत आहे. त्यामुळे आम्हीदेखील निश्चिंत असून, दिवसेंदिवस आमचा समता पतसंस्थेवरील विश्वास वाढतच आहे.’

संस्थेचे ठेव विभाग प्रमुख संजय पारखे यांनी सूत्रसंचालन केले. या प्रकाशन सोहळ्याला संस्थेचे सभासद हितचिंतक मुख्य कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. उपस्थितांचे आभार जनरल मॅनेजर सचिन भट्टड यांनी मानले.