राष्ट्रसंत जनार्दन स्वामी यांच्या ३३ व्या पुण्यतिथी निमीत्त जपानुष्ठाण सोहळा

 कोपरगांव प्रतिनिधी, दि. २४ : कोपरगांव बेट भागातील राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांचा तेहतीसावा पुण्यतिथी सोहळा समाधीस्थानी २८ नोव्हेंबर ते ५ डिसेंबर दरम्यान आयोजित केला असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री काशिविश्वनाथ महादेव शैक्षणिक व गोपालन ट्रस्टचे मठाधिपती विश्वस्थ प. पू. स्वामी रमेशगिरीजी महाराज, अध्यक्ष दत्तात्रय बाळकृष्ण होळकर व उपाध्यक्ष विलास यादवराव कोते यांनी केले आहे. या कार्यक्रमासाठी वाराणशी येथील जुना पंचदशनाम आखाडयाचे अखिल भारतीय आखाडा परिषदचे आंतरराष्ट्रीय संरक्षक महामंत्री महंत स्वामी हरिगिरीजी महाराज यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. 

          या पुण्यतिथी काळात दररोज पहाटे ५ ते ६ नित्यनियम विधी ६ ते ७ सत्संग प्रवचन, दररोज सकाळी ८.३० ते ११ हभप गणपत महाराज लोहोटे यांचे गुरूचरित्र ग्रंथाचे सामुदायीक पारायण, रात्री ८ वाजता प्रवचन सत्संग, सायंकाळी ७.३० वाजता आरती आदि धार्मीक कार्यक्रमांचे आयोजन करण्यांत आले आहे. 

            या संपुर्ण सप्ताह काळात हभप गुरूवर्य भास्करगिरी महाराज, सरलाबेटाचे प्रमुख ह. भ. प. रामगिरी महाराज, हभप रघुनाथजी खटाणे महाराज, हभप उध्दव महाराज मंडलिक, हभप अरूणगिरी महाराज, हभप राजेंद्रगिरी महाराज, प. पू. काशिकानंदगिरी महाराज आदि संत -महंत सदिच्छा भेटी देणार आहेत. 

         तर  प. पू. रमेशगिरी महाराज (२८ नोव्हेंबर) श्री श्री १००८ महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज (२९ नोव्हेंबर), हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचे दुपारी ४ वाजता व्याख्यान तर प. पू. दिनेशगिरीजी महाराज (३० नोव्हेंबर), हभप भानूदास महाराज बैरागी भारूड (१ डिसेंबर), शिवभक्त भाउ पाटील (२ डिसेंबर), प. पू. माधवगिरीजी महाराज (४ डिसेंबर) यांची प्रवचने होतील तर वेदांताचार्य प्रा. हभप शरदचंद्र शास्त्री आळंदीकर किर्तन (३ डिसेंबर) रोजी होत आहे. 

         ५ डिसेंबर रोजी जनार्दन स्वामी पुण्यतिथी दिनी पहाटे ३.३० समाधी महापुजा, पहाटे ४ वाजता नित्यनियम विधी पठण, पहाटे ५ वाजता काकडा, सकाळी ९ ते १२ स्वामींच्या पादुका व सत्संग तर दुपारी साडेबारा वाजता आमटी भाकरीचा महाप्रसादांने या उत्सवाची सांगता होईल. 

            या सर्व धार्मीक पुण्यतिथी कार्यक्रमासाठी भाविकभक्तांनी सढळ हाताने मदत करावी व जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहुन या धार्मीक सोहळयाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री संत सदगुरू जनार्दन स्वामी (मौनगिरी) महाराज समाधी स्थान व काशिविश्वनाथ ट्रस्ट मठाचे सचिव अंबादास अंत्रे, विश्वस्थ सर्वश्री त्रंबक कृष्णाजी पाटील, रामकृष्ण बंडुजी कोकाटे, अनिल बाप्पासाहेब जाधव, आशुतोष विलासराव पानगव्हाणे, संदिप मोहनराव चव्हाण, अतुल बाबुराव शिंदे, शिवनाथ सुभाषराव शिंदे आदिनी केले आहे.