पोलीस स्टेशनच्या परिसरात दिवसाढवळ्या अल्पवयीन चोरांची टोळी

कोपरगाव पोलीस स्टेशनच्या आवारातील वाहने असुरक्षित

कोपरगाव प्रतिनिधी दि.२५ : चक्क पोलीस स्टेशनच्या आवारातून दिवसा ढवळ्या शाळकरी चोरांची टोळी गाड्यांची किंवा गाड्यांचे साहित्याची चोरी करतात असे जर कोणी सांगितले तर त्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. सामान्य माणुस  पोलीस स्टेशनला जायचे म्हंटले तरी त्याला आगोदर घाम फुटतो अशा ठिकाणी चोर तर कसे काय येणार असेच आपणास वाटेल. पण कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये गुरूवारी चक्क पोलीसांनीच तीन अल्पवयीन मुलांना दिवसा गाड्यांचे साहित्य खोलून चोरताना रंगेहात पकडे.

कमालीची बाब म्हणजे गाड्यांचे सुट्टे पार्ट खोलून ते भंगारमध्ये विकण्याचा प्रताप अनेकवेळा केल्याची कबुली एका पकडलेल्या अल्पवयीन चोराने दिली. तो म्हणाला साहेब मी आजच पहील्यांदा आलोय. मला एका मिञाने पोलीस स्टेशन परिसरातील गाड्यांचे सुट्टे साहित्य खोलण्यास सांगितले. मी आजुन गाडी खोलली सुध्दा नाही. मी जवळच्याच काॅलेजमध्ये शिक्षण घेतोय. मिञाने माझ्या बॅगेत जबरदस्तीने पक्कड व स्क्रुड्रायव्हर टाकले व मला पोलीस स्टेशनच्या परिसरातील गाड्यांची खोलखाल करायला सांगितले असे म्हणत दुसऱ्याकडे बोट करीत त्या अल्पवयीन मुलाने आपली सुटका करून घेण्याचा प्रयत्न करीत होता.

इतक्या मोठ्या पोलीसांच्या गराड्यात त्या अल्पवयीन मुलाच्या तोंडातुन आंबट वास येत होता. तोंडात गुटखा चघळत मुलगा खुशाल दुसऱ्याकडे बोट करुन धिटपणे आपली बाजू पोलीस व पञकारासमोर मांडत होता. तर त्याच्या सोबतचा सहकारी म्हणाला मला गाड्यांचे पार्ट खोलायचे हे माहीत नव्हते. मी सहज यांच्या सोबत आलो होतो. चोऱ्या करणारे खरे चोर पळुन गेले त्यांनीच आम्हाला सांगितले आहे. ते बऱ्याच दिवसांपासून या भागातील गाड्यांचे साहित्य चोरुन भंगारमध्ये विकुन मज्या करतात.

आमचा यात काहीच दोष नाही हो साहेब से सांगुन विनव्या करीत होता. उपस्थित पोलीसांनी पोलीसी खाक्या दाखवताच आपल्या साथीदारांची नावे सांगितले लागलीच पोलीसांनी इतर एकाला पुन्हा ताब्यात घेतले. तिघेही अल्पवयीन होते त्यामुळे पोलीसांना काही मर्यादा आल्या. पोलीसांनी सखोल चौकशी केली असता हे अल्पवयीन मुलं शाळा काॅलेजच्या नावाखाली घरातुन बाहेर निघतात.

किरकोळ बंगार चोरुन त्याच पैशाची गावठी दारू एकञ पितात अशी कबुली त्यांनी पोलीसांना दिली. विशेष म्हणजे पोलीसांनी पकडले तेव्हा हे गावठी दारु पिल्याचे कबुली दिली. संतापलेल्या पोलीसांनी योग्य प्रसाद देवून त्यांच्या पालकासमोर उभे करुन सत्य कहानी सांगितली तेव्हा त्यांचे पालकही अवाक झाले. अखेर राञी उशिरा तिघा अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला. अल्पवयीन चोरट्यानी आता मोठी चोरी केली नाही. शिवाय त्यांचे शिक्षणाचे वय आहे याचा माणुसभावनेतून पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी विचार करुन अखेर त्यांना  सज्जड दम देवून राञी उशिरा सोडून दिले.

 गाड्यांचे साहित्य चोरणाऱ्या मुलांच्या बॅगेत दप्तर कमी पण चोरीसाठी लागणारे साहित्य ज्यास्त होते. पोलीसांनी त्यांच्या स्कुलबॅगेतून पक्कड, स्क्रुड्रायव्हर, स्टेफनी व जॅक ताब्यात घेतले.

दरम्यान  कोपरगाव शहर पोलीस स्टेशनच्या परिसरातील व पोलीस वसाहतीच्या आवारातील शेकडो वाहनांना एकतर कोणीच वाली नसल्याने ते अनेक वर्षापासून धुळखात पडून आहेत. काही वाहनांवर चक्कं गवत उगवले आहे. तर काही वाहनांचा खत झाला आहे. वाळूचे ट्रॅक्टर, व इतर चारचाकी वाहने तसेच शेकडो  मोटारसायकलींनी पोलीस वसाहतीचा परिसर व्यापला आहे. 

पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुला बाळांना खेळण्यासाठी एकमेव मोकळी जागा होती माञ पोलीसांनी विविध गुन्ह्यात जप्त केलेले वाहने पोलीस वसाहतीच्या मैदानात लावल्याने पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाचे आरोग्य पोलीसांनीच धोक्यात आणले. शिवाय त्या वाहनांची देखरेख करण्याची जबाबदारी त्यांच्यावर आल्याने असुन आडचन नसुन खोळंबा अशी अवस्था पोलीसांची झाली आहे.

बेवारस वाहने लावले आहेत ते चोरीला गेले तरी पोलीसांची बदनामी होते. अशा दुहेरी अवस्थेत पोलीस असताना आता चोरांनी चक्क पोलीसांना आव्हान दिले आहे. दिवसा पोलीसांच्या डोळ्यात धुळ उडवत गाड्यांची किंवा त्यांचे सुट्टे साहित्य चोरण्याची मजल कोणी अट्टल चोर करीत नाहीत तर महाविद्यालयीन शिक्षण घेणारे अल्पवयीन मुलं करीत असतील तर काय भवितव्य असेल त्या मुलांचे आणि काय दरारा असेल त्या पोलीसांचा.

राञी चोऱ्या करताना अट्टल चोर शंभर वेळा विचार करतात, माञ कोपरगाव शहरातील अल्पवयीन मुलं पोलीस स्टेशन परिसरात येवून मस्त मावा, गोवा खात बिनधास्त चोऱ्या करतात यावरुन कोणाचा कोणावर प्रभाव आणि दबाव आहे हे विचार करण्याची बाब आहे.