सायकलिंग स्पर्धेत काकडे विद्यालयाचे यश

शेवगाव प्रतिनिधी, दि.२५ :  पुणे विभागीय शालेय सायकलिंग स्पर्धा चांदबिबी महाल बायपास रोड अहमदनगर येथे २५ डिसेंबरला संपन्न झाल्या. या स्पर्धेमध्ये आबासाहेब काकडे विद्यालयातील १९ वर्ष वयोगटा खालील मुलींच्या स्पर्धेत समृद्धी अशोक आहेर व १९ वर्ष वयोगटा खालील मुलांच्या गटामध्ये प्रद्युम्य वैभव केदारी यांनी तृतीय क्रमांक प्राप्त केला आहे.

या यशाबद्दल अध्यक्ष ॲड.विद्याधर काकडे, जि.प.सदस्या हर्षदा काकडे, प्रा.लक्ष्मण बिटाळ, विश्वस्त पृथ्वीसिंग काकडे, प्राचार्य संपत दसपुते, उपप्राचार्या रुपा खेडकर, उपमुख्याध्यापिका मंदाकिनी भालसिंग, पर्यवेक्षक शिवाजी पोटभरे, सुनिल आव्हाड पुष्पलता गरुड यांनी त्यांचे कौतुक करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.