दरोडा घालणारे ५ आरोपी मुद्देमालासह जेरबंद

शेवगाव प्रतिनिधी, दि.२५ : गुरुवार दि.२१ रोजी चापडगाव शिवारात रात्री 1.00 ते 2.00 वा. चे सुमारास चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश करुन फिर्यादी तसेच त्यांचे कुटुंबियांना चाकुचा धाक दाखवुन मोबाईल, सोन्या चांदीचे दागिने, मोटारसायकल, टी.व्ही, गॅस शेगडी, सहा शेळ्या असा एकुण १,०८,७००/- रुपये किमतीचा मुद्देमाल दरोडा टाकुन चोरुन नेला होता.

तसेच रविवार दि.२४/१२/२०२३ रोजी आखेगाव येथे रात्री एकच्या सुमारास चोरट्यांनी प्रवेश करुन फिर्यादीची आई मंगल पायघन हिचे डोळयाच्या जवळ धारदार शस्त्राने तसेच रामकिसन पांडु काटे यांना मारहाण करुन ५०,०००/- रुपये रोख रक्कम दरोडा टाकुन चोरुन नेली होती. सदर घटनेबाबत शेवगाव पोलीस ठाणे गु.र.नं. ११७२/२०२३ भादवि कलम ३९२, ४५२,५०४, ५०६, ३४ व गु.र.नं. ११८३/२०२३ भादवि कलम ३९४, ४५२,४५७,३८०,५०६,५११,३४ प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले.

सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन जिल्हा पोलिस अधिक्षक राकेश ओला, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे विशेष पथक नेमून गुन्ह्याचा सखोल व बारकाईने समांतर तपास करुन गुन्यातील आरोपींचा शोध घेऊन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेश दिले होते.

नमुद आदेशान्वये पो.नि. दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिस उपनिरीक्षक सोपान गोरे, पोहेकॉ/मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संतोष लोढे, पोना/रविंद्र कर्डीले, संदीप चव्हाण, संदीप दरंदले, फुरकान शेख, संतोष खैरे, पोकॉ/अमोल कोतकर, भाऊसाहेब काळे, शिवाजी ढाकणे, रविंद्र घुंगासे, सागर ससाणे, रोहित येमुल, आकाश काळे, किशोर शिरसाठ, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड, चासफौ/ उमाकांत गावडे, चापोकॉ/अरुण मोरे अशा पोलीस अधिकारी व अंमलदार यांची दोन विशेष पथके तात्काळ रवाना केली.

विशेष पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी घटना ठिकाणी जावुन बारकाईने पहाणी करुन शेवगाव तालुक्यामध्ये आरोपींची माहिती काढत असतांना पो.नि. दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा सदरचा गुन्हा हा दिपक गौतम पवार रा. टाकळी अंबड ता. पैठण याने व त्याचे इतर साथीदारांनी केलेला असुन ते सध्या त्यांचे टाकळी अंबड येथील घरी व घरासमोर असलेल्या पालावर आलेले असल्याची खात्रीशिर बातमी मिळाल्याने पो.नि दिनेश आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आदेश दिले.

पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी तात्काळ टाकळी अंबड ता. पैठण येथे जावुन दिपक गौतम पवार याचे घरास व त्याचे घरासमोरील असलेल्या पालांना चोहोबाजुने सापळा लावला असता सदर पालांमधुन काही इसम जवळच असलेल्या ऊसाचे शेतामध्ये पळुन गेले. पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी घरातील व पालामधील तसेच ऊसामध्ये जावुन लपुन बसलेल्या इसमांना ताब्यात घेवुन त्यांना त्यांचे नाव गाव विचारता त्यांनी त्यांचे नावे १) दिपक गौतम पवार वय ३५ वर्षे, रा. टाकळीअंबड, ता. पैठण, जि.छ. संभाजीनगर, २) नितीन मिसऱ्या चव्हाण वय २० वर्षे, रा. जोडमालेगांव, ता. गेवराई, जि. बीड, ३) गोविंद गौतम पवार वय २० वर्षे, रा. टाकळीअंबड, ता. पैठण, जि. छ. संभाजीनगर, ४) किशोर दस्तगीर पवार वय १९ वर्षे, रा. हिरडपुरी, ता. पैठण, जि. छ. संभाजीनगर, ५) राजेश दिलीप भोसले वय ३० वर्षे, रा. टाकळीअंबड, ता. पैठण, जि. छ. संभाजीनगर असे असल्याचे सांगितले.

त्यांचेकडे गुन्ह्याबाबत सखोल विचारपुस करता त्यांनी त्यांची इतर फरार साथीदार नामे ६) सोन्या मजल्या भोसले रा. खंडाळा, ता. पैठण, जि. छ. संभाजीनगर, ७) उद्या मजल्या भोसले रा. टाकळी अंबड, ता. पैठण, जि. छ. संभाजीनगर, ८) संभाजी गौतम पवार रा. सदर, ९) अभिषेक भैया चव्हाण रा. खंडाळा, ता. पैठण, जि. छ. संभाजीनगर, १०) संभाजी गौतम पवार याचा मित्र नाव गाव माहित नाही यांचेसोबत गुन्हा केल्याची कबुली दिली आहे.
गुन्ह्यातील चोरीस गेले मालापैकी, मोबाईल, रोख रक्कम, शेळ्या, मोटारसायकल असा एकुण 2,49,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असुन त्यांना ताब्यात घेवुन पुढील तपासकामी शेवगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी हजर करण्यात आले आहे. पुढील तपास शेवगाव पोलीस स्टेशन करीत आहे.