तुमचे आशीर्वाद व माझ्या प्रयत्नातून निळवंडेच्या पाण्याने बंधारे भरले – आमदार काळे

कोपरगाव प्रतिनिधी, दि.१८ : मागील पाच दशकापासून ज्या निळवंडेच्या पाण्याची जनता आतुरतेने वाट पाहत होती. ती प्रतीक्षा तुमचे आशीर्वाद व माझ्या प्रामाणिक प्रयत्नातून पूर्ण झाली आहे. त्यामुळे रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव, अंजनापूर, बहादरपूर, डांगेवाडी, मनेगाव आदी गावातील पाझर तलाव, बंधारे, ओढे भरले जावून दरवर्षी उन्हाळ्यात पाण्याची भेडसावणारी चिंता दूर झाली. याचे मोठे समाधान वाटत असल्याचे आ. आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

कोपरगाव मतदार संघातील कायम स्वरूपी दुष्काळी भागातील रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव, अंजनापूर, बहादरपूर, डांगेवाडी, मनेगाव येथील पाझर तलाव, बंधारे, ओढे पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी स्वत: जातीने उभे राहून आ.आशुतोष काळे यानी हे बंधारे निळवंडेच्या डाव्या कालव्यातून भरून देण्यासाठी पाठपुरावा केला. त्यामुळे या गावाची पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण दूर झाली आहे. त्याबद्दल या गावातील नागरिकांनी आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते जलपूजन करून त्यांचा जाहीर सत्कार केला याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी आ.आशुतोष काळे म्हणाले की, निळवंडेच्या डाव्या कालव्याचे पाणी बंधाऱ्यात कसे आले ओढे, नाले कसे भरले हे जनतेला माहीत आहे. मात्र, ज्यांचे यासाठी कोणतेही योगदान नाही. ते मात्र, काहीही न करता भाषण ठोकून नेहमीप्रमाणे न केलेल्या कामाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करीत असले तरी जनता मात्र, सुज्ञ आहे. तुम्ही मला लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिले व आपल्या आशीर्वादाने मला सत्ताधारी पक्षाचा आमदार होता आले. त्यामुळे सरकारमध्ये आपल चांगलच धकत असल्याचे सांगत पाणी कमी पडणार असे वाटत असतांना पालक मंत्र्यांना भेटून दीड टीएमसी पाणी वाढवून घेतले.

मागील पाच दशकापासून कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या भागातील नागरिक निळवंडेच्या पाण्याची चातकासारखी वाट पाहत होते. आमच्या हयातीत निळवंडेचे पाणी दुष्काळी भागाला मिळेल याची आम्ही आशा सोडली होती. मात्र, आ. आशुतोष काळे यांनी आमच्या हयातीत आम्हाला निळवंडेचे पाणी आणून दिले, त्यामुळे आमच्या पुढच्या पिढीचे भवितव्य आशावादी झाले आहे. त्याबद्दल दुष्काळी भागातील जनता त्यांची ऋणी असून या भागातील जनतेचे आशीर्वाद नेहमीच आ.आशुतोष काळेंच्या पाठीशी राहतील. – निवृत्ती गव्हाणे (अंजनापूर).

त्यामुळे सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरले आहे. या भागातील पाण्याचा प्रश्न, रस्त्याचा प्रश्न, विजेचा प्रश्न टप्या टप्याने मार्गी लागत आहे. अंजनापूर ते रांजणगाव देशमुख तालुका हद्द पर्यंतच्या रस्त्याला ५ कोटी निधी दिला असून निविदा प्रसिद्ध होवून सबंधित ठेकेदाराला काम सुरु करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यापूर्वीचे १० कोटीचे झगडे फाटा ते अंजनापूर रस्त्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या अंतर्गत ४.११ कोटी निधीतून बहादरपूर-अंजनापूर-रांजणगाव देशमुख या रस्त्याचे देखील वर्क ऑर्डर झाली असून या रस्त्यांचे लवकरच काम सुरु होईल. आपल्या सर्वांचा पाठिंबा यापुढेही राहणार आहे. त्यामुळे केलेल्या विकास कामांवर जास्तीत जास्त मतांनी निवडून द्या. असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी यावेळी केले.

अक्षय गव्हाणे, संपत खालकर, ज्ञानेश्वर नेहे, ज्ञानदेव गव्हाणे, दत्तू गव्हाणे, गोरक्षनाथ वर्पे, पंकज पुंगळ, सिताराम गव्हाणे, भाऊ रहाणे, अर्जुन वेताळ, श्रीकांत गुरसळ, रघुनाथ गव्हाणे, महेश नाईकवाडे, राजेंद्र गव्हाणे, हौशीराम गव्हाणे, जालिंदर कोल्हे, दादा गव्हाणे, अमोल सदाफळ, श्याम गोसावी, मंगेश खंडीझोड, प्रल्हाद गाडे, संजय बर्डे, तुषार गोसावी, राजू इनामदार, तुकाराम गव्हाणे, निबु कोल्हे, मामा भडांगे, नाना शेंडगे, नवनाथ गव्हाणे, आप्पासाहेब शेंडगे, धोंडीराम कोल्हे, शंकर गोसावी, महेश गव्हाणे, वसंत पाडेकर, सतीश खालकर, जैनु इनामदार, बाबुराव गव्हाणे, बाळू खंडिझोड, विनायक कोल्हे, बाबासाहेब गायकवाड, वसंत गायकवाड, नामदेव गोर्डे, चंद्रकांत पाडेकर, नजीर इनामदार, शाहरुख सय्यद, आनंदा भडांगे, ज्ञानेश्वर वाघ, संतोष भडांगे, अजय शेळके, प्रमोद गोसावी, हारूण इनामदार, दामू गोसावी, महंमद इनामदार, दत्तात्रय गांगवे, नारायण गोसावी, तुषार गोसावी, अरुण कोल्हे, गोवर्धन गांगवे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी सुनील शिंदे, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक शंकर चव्हाण, राहुल रोहमारे, गंगाधर औताडे, बाजार समितीचे संचालक संजय शिंदे, पद्मविभूषण डॉ.शरदचंद्रजी पवार पतसंस्थेचे चेअरमन देवेन रोहमारे, किसन पाडेकर, बाबुराव थोरात, गजानन मते, बहादरपुरचे सरपंच गोपीनाथ रहाणे, वेसच्या सरपंच जया माळी, अंजनापुरच्या सरपंच कविता गव्हाणे, नंदकिशोर औताडे, कौसर सय्यद, सिकंदर इनामदार, युवराज गांगवे, रंगनाथ गव्हाणे, चांगदेव शिंदे, ज्ञानेश्वर गव्हाणे, कृष्णा गव्हाणे, निवृत्ती गव्हाणे, संतोष वर्पे, अशोक गव्हाणे, नानासाहेब गव्हाणे, रवींद्र वर्पे, विजय कोटकर, संतोष गव्हाणे, अमोल पाडेकर, नानासाहेब नेहे, रामनाथ पाडेकर, लहानू गव्हाणे, गोकुळ पाचोरे, रामनाथ थोरात, भास्कर महाराज गव्हाणे,