बाल आनंद मेळाव्यातून विध्यार्थ्यामध्ये व्यवहार ज्ञान वाढते – परजणे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २४ :  तालुक्यातील संवत्सर येथिल जनता  इंग्लिश स्कूल मध्ये बाल आनंद मेळाव्याचे उदघाटन   शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मधुकर साबळे यांच्या हस्ते झाले. त्याचप्रमाणे वार्षिक स्नेहसंमेलनाचे उदघाट्न कार्यक्रच्या अध्यक्षा संवत्सरच्या सरपंच, सौ सुलोचना दिलीप ढेपले यांचे हस्ते दिपप्रज्वलन करून झाले.

यावेळी उपसरपंच विवेक परजणे आपल्या भाषणात म्हणाले की, बाल आनंद बाजारात छोटासा बाजार तयार करून खरोखर विविध खाण्याचे पदार्थ व विविध भाजीपाला विक्री करण्याचे ज्ञान, व्यवहार या माध्यमातून कळतो. म्हणजेच मुले व्यवहारिक होतात. त्याचप्रमाणे मुलामुलींनी विविध सामुदायिक गीत सादर करून सर्वाना मंत्रमुग्ध केले. यातून मुलांना अभिनय व कलेची प्रेरणा मिळते.

तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन पाटील संवत्सर सौ. लिनाताई विकास आचारी, स्थानिक सल्लागार समितीचे  सदस्य अशोक लोहकणे, विधिज्ञ शिरीष लोहकणे,  महेश परजणे पा.  मुकुंद काळे, बाळासाहेब बारहाते, युवराज शिंदे, मारुती लोखंडे, बापू तिरमखे, ज्योतीताई कोल्हे, पोपट बोरनारे, तुषार ससाणे, चांगदेव मैंद, कैलास पांडव, बबन भाकरे, बाबुराव माईन्ड, दिलीप ढेपले तसेच शाळेचे मुख्याध्यपक आर. एस, प्रर्यवेक्षक शरद अंबिलवादे सर्व शिक्षक विध्यर्थी व ग्रामस्थ मोठ्या  संख्येने उपस्थित होते.