महिला पालकांच्या क्रीडा स्पर्धेचा अनोखा फंडा
शेवगाव प्रतिनिधी, दि .२३ : येथील उमाचंद्र एज्युकेशन फाउंडेशन संचलित ज्ञानमावली इंग्लिश स्कूलमध्ये क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये प्री प्रायमरी व प्रायमरी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. यावेळी शालेय अंतर्गत वैयक्तिक तसेच संगीत स्पर्धा अशा विविध स्पर्धाचे नियोजन करण्यात आले. या तीन दिवसीय क्रीडा महोत्सवात आज शुक्रवारी शेवटच्या दिवशी महिला पालकांसाठी संगीत खुर्ची व लिंबू चमचा या स्पर्धांचे अनोखे आयोजन करण्यात आले.
यावेळी विद्यार्थ्यांनी उत्साह पूरक वातावरणामध्ये सहभागी होऊन विविध खेळांचा आनंद लुटला. क्रीडा महोत्सवाचा आज शुक्रवारी समारोप झाला. शेवटचा दिवस हा महिला पालकांसाठी ठेवण्यात आला. महिला पालकांसाठी संगीत खुर्ची व लिंबू चमचा या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. क्रीडा महोत्सवात महिला पालकांना देखील सहभागी करुन घेण्याचा अनोखा फंडा येथे राबविव्यात आला. त्यास पालकवर्गाने उत्तम प्रतिसाद देऊन क्रीडा महोत्सवाची शोभा वाढवली. त्यानंतर उपस्थित पालकांच्या हस्ते विजेत्या खेळाडूंना बक्षीसे देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी संस्थेचे संचालक माननीय प्रा. नवनाथ सुडके यांनी विद्यार्थी पालकांसी हितगुज साधले. ते म्हणाले, अशा स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो तसेच भविष्यातील एक आदर्श नागरिक घडविण्याचे काम या माध्यमातून होते. मुख्याध्यापिका वर्षा सुडके सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी खेळाचे नेटके नियोजन केले होते.