जास्तीत जास्त कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न – आमदार राजळे

मतदार संघात ६५ कोटीवर रस्त्याची कामे सुरू

शेवगाव प्रतिनिधी, दि. १३ : या अगोदरची परिस्थिती वेगळी होती महाविकास आघाडीच्या काळात विरोधी पक्षाचा  लोकप्रतिनिधी म्हणून निधी देण्यात डावडले जात होते. आत्ता भाजप समविचारी पक्षाचे सरकार सत्तेत आल्यापासून  अवघ्या  अडीच तीन महिन्याच्या कालावधीत कोट्यावधी रुपयांचा निधी मतदार संघात आणून मोठ्या प्रमाणावर विकास कामे हाती घेण्यात आली असून शेवगाव पाथर्डी तालुक्यातील रस्त्यांच्या कामासाठी  तब्बल ६५ कोटी रुपया पेक्षा अधिक  निधी मिळाला असून लवकरच कामे पूर्ण होणार असल्याचे आमदार मोनिकाताई राजळे यांनी सांगितले.

      तालुक्यातील अधोडी येथील आमदार स्थानिक विकास निधीतून दहा लक्ष रुपये खर्चाच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोरील सभामंडपाचे भूमिपूजन ह.भ.प. पांडुरंग महाराज झुंबड ह.भ.प. कानिफनाथ महाराज पोटभरे यांच्या शुभहस्ते पार पडला यावेळी आ. राजळे अध्यक्षपदावरून बोलत होत्या.

यावेळी  तालुका सरचिटणीस राम केसभट, भाजपचे तालुका उपाध्यक्ष कासम शेख, भाऊसाहेब मुरकुटे,  संदीप देशमुख, गावचे सरपंच जयश्री सुगंध खंडागळे, उपसरपंच राधाकिसन येवले, आप्पासाहेब पोटभरे, भाऊसाहेब येवले,  शंकर येवले,रमेशराव खंडागळे, पंडितराव पोटभरे, संतोष पोटभरे, रमेश राठोड,जिल्हा सरचिटणीस अंबादास ढाकणे,पांडुरंग तहकीक,  सा. बा. उपअभियंता प्रल्हाद पाठक, शाखा अभियंता अभियंता रामेश्वर राठोड, सुरेशराव घुले आधीसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुगंध खंडागळे यांनी केले तर गोटीराम पोटभरे यांनी आभार मानले.