गोपाजीबाबा देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मिळवून देणार – आमदार काळे 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २० : बहादरपुर व पंचक्रोशीतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री संत गोपाजीबाबा देवस्थानाचा विकास करून भाविकांना सर्व सुविधा मिळाव्या यासाठी श्री गोपाजीबाबा देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मिळवून देवून परिसराच्या विकासासाठी अधिक निधी देवू अशी ग्वाही आ.आशुतोष काळे यांनी दिली.

कोपरगाव तालुक्यातील बहादरपूर येथे येथे४० लक्ष रुपये निधीतून करण्यात येणाऱ्या राहाता – वावी रस्ता (गाडेकर वस्ती ते खकाळे वस्ती) व हवालदार मळा ते रहाणे वस्ती रस्ता डांबरीकरण करणे कामाचे भूमिपूजन व १० लक्ष रुपये निधीतून देण्यात आलेल्या जिम साहित्याचे व ७ लक्ष रुपये निधीतून बसवण्यात आलेल्या पाणीपुरवठा विभाग सोलर पंपचे लोकार्पण आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते पार पडला याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पंचायत समिती सदस्य दादासाहेब राहणे होते.

 पुढे बोलतांना आ.आशुतोष काळे म्हणाले की, श्री गोपाजीबाबा देवस्थानास ‘क’ वर्ग दर्जा मिळावा यासाठी सर्व अडचणी दूर करून प्रस्ताव सादर करण्यात आला असून त्याबाबत पाठपुरावा सुरू आहे. आमदार निधी प्रमाणे जिल्हा परिषद पंचायत समितीच्या माध्यमातून देखील विकास कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळविता येवू शकतो हे मागील पाच वर्षात कोपरगाव तालुक्यातील जनतेने पाहिले आहे अनुभवले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत तुम्ही सेवा करण्याची दिलेल्या संधीचे सोने करून कोट्यावधी रूपयांचा निधी आणून मतदार संघाचा विकास केला. ही परंपरा यापुढे अशीच सुरू ठेवण्यासाठी पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकीत दिलेल्या उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन केले.

यावेळी यावेळी भिकाहरी रहाणे व बाबासाहेब रहाणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला त्यांचे आ.आशुतोष काळे यांनी स्वागत केले. तसेच बहादरपुरचे भूमिपुत्र  तुषार रहाणे, सूरज रहाणे, गौतम गोरे व दीपक गव्हाणे यांची पोलीस दलात निवड झाल्याबद्दल, आकाश रहाणे यांची महाराष्ट्र शासन भूमी अभिलेख विभागात निवड झाल्याबद्दल व रामनाथ रहाणे, नानासाहेब रहाणे, मोहन रहाणे व विजय रहाणे यांचा सेवानिवृत्तीबद्दल आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक राहुल रोहमारे, प्रविण शिंदे, गंगाधर औताडे, बाबुराव थोरात, सिकंदर इनामदार, कौसर सय्यद, नंदकिशोर औताडे, सरपंच गोपीनाथ रहाणे, रामनाथ पाडेकर, बाबासाहेब लक्ष्मण रहाणे, पाराजी रहाणे, साहेबराव रहाणे, प्रशांत रहाणे, शिवाजी रहाणे, विजय रहाणे, बाळासाहेब चिमणराव रहाणे, बाळासाहेब सावळेराम रहाणे, मच्छिन्द्र रहाणे, भाऊसाहेब रहाणे, सतिश रहाणे, मारुती रहाणे, साईनाथ रहाणे,

गोपीनाथ खकाळे, गणेश रहाणे, दत्तात्रय खकाळे, पंढरीनाथ रहाणे, सतिश पवार, आप्पासाहेब पाडेकर, बाबासाहेब खकाळे, रामचंद्र पवार, वामनराव रहाणे, जगन बोरसे, बबनराव रहाणे, रामनाथ रहाणे, निर्मल गोरे, गजानन मते, सुभाष रहाणे, केरु रहाणे, महेश नाईकवाडे, संतोष वर्पे, राजेंद्र रहाणे, साहेबराव खकाळे, सोमनाथ निवृत्ती रहाणे, संदीप जोर्वेकर, पुंजाहरी बन्सी रहाणे, आबा रहाणे, विलास पाडेकर, एकनाथ रहाणे, नानासाहेब पाडेकर, कचरु रहाणे, संदीप रहाणे,

दगडू रहाणे, पुंजाहरी रहाणे, नानासाहेब रहाणे, धनंजय जोर्वेकर, सीताराम रहाणे, राहुल रहाणे, सोमनाथ अशोक रहाणे, नानासाहेब रहाणे, बाळासाहेब रहाणे, गोरख खकाळे, रवींद्र रहाणे, सोमनाथ खकाळे, रामनाथ रहाणे, बापू रहाणे, रामनाथ तुळशीराम रहाणे, बाबासाहेब रहाणे, शुभम रहाणे, विजय रहाणे, ज्ञानेश्वर गव्हाणे, विजय कोटकर, सुभाष सयाराम रहाणे, गंगाधर रहाणे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.