लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगाव सामाजिक कार्यात अग्रेसर – संदीप कोयटे

लायन्सच्या अध्यक्षपदी सुमित भट्टड तर लिओच्या अध्यक्षपदी पृथ्वी शिंदे

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ५ : तालुक्यातील विविध सामाजिक कार्यामध्ये लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगाव हिरीरीने सहभागी होत असतो. लायन्स व लिओचा सामाजिक कार्यातील सहभाग हा विशेष उल्लेखनीय असून कोपरगावकरांना एक्सपोच्या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध देत कोपरगावच्या बाजारपेठेला चालना मिळत असते. तसेच विविध शिबिरे, वृक्षारोपण यासारख्या विविध सामाजिक उपक्रमांमधून सामाजिक दायित्वाची भूमिका पार पाडत असतात. महाभयंकर अशा कोरोना काळातही लायन्स व लिओ क्लबने केलेली सामाजिक कामगिरी कौतुकास्पद आहे.

कोपरगाव तालुक्यात लायन्स क्लबच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये नुतन पदाधिकाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असल्यामुळे विविध पदांच्या माध्यमातून त्यांना काम करण्याची सुवर्णसंधी मिळालेली असून लायन्स व लिओ क्लब सामाजिक कार्यात अग्रेसर असल्याचे लायन्स क्लबचे माजी विभागीय चेअरमन संदीप कोयटे यांनी लायन्स व लिओ क्लब ऑफ कोपरगावचा ५३ वा पदग्रहण व शपथ विधी सोहळ्यात बोलताना सांगितले.

कोपरगाव शहरातील के.जे.सोमैया महाविद्यालयाच्या साकरबेन सभागृहात लायन्स क्लब ऑफ कोपरगाव आणि लिओ क्लब ऑफ कोपरगावच्या नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे पद ग्रहण लायन्स क्लबचे पहिले आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र एस.भंडारी यांच्या हस्ते आणि माजी विभागीय चेअरमन संदीप कोयटे यांच्या शुभहस्ते शपथ विधी सोहळा उत्साहात पार पडला. त्या प्रसंगी ते बोलत होते.

प्रसंगी लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे नुतन अध्यक्ष सुमित भट्टड, सचिव प्रसाद भास्कर, खजिनदार अभिनंदन शिंगी आणि लिओ क्लब ऑफ कोपरगावचे नुतन अध्यक्ष पृथ्वी शिंदे, सचिव हर्षल कृष्णानी, खजिनदार जय बोरा आदींसह इतर नव नियुक्त पदाधिकाऱ्यांनी ही पदग्रहण करत शपथ घेतली.

लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे नुतन अध्यक्ष सुमित भट्टड मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, कोपरगाव शहरातील भट्टड परिवार हा लायन्स क्लबच्या माध्यमातून सामाजिक कार्यात मोलाचे योगदान देत आलेला आहे. या पुढेही मिळालेल्या संधीचे सोने करून लायन्स क्लबच्या माध्यमातून कोपरगावकरांची सेवा करण्याची संधी मिळाली. हे मी माझे भाग्यच समजतो. तसेच अध्यक्ष पदाच्या माध्यमातून पुन्हा एकदा नव्याने प्रस्तानम म्हणजे नवीन कार्यकाळाची सुरुवात आम्ही सर्व पदाधिकारी करत आहोत.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.शैलेंद्र बनसोडे यांनी केले.या कार्यक्रमाला संदीप रोहमारे, राजेश ठोळे, सुधीर डागा, बाबा खुबाणी, सत्येन मुंदडा, ॲड.विजय गवांदे, अक्षय गिरमे, सिद्धेश कपिले,नरेंद्र कुर्लेकर, लायन्स क्लब ऑफ कोपरगावचे मावळते अध्यक्ष परेश उदावंत, लिओचे मावळते अध्यक्ष सुमित सिनगर, कन्व्हेनर अभिजीत आचार्य, राम थोरे, लिओचे को – कन्व्हेनर आदित्य गुजराथी, भट्टड परिवार आदींसह लायन्स आणि लिओ क्लब ऑफ कोपरगावचे पदाधिकारी, सदस्य, हितचिंतक उपस्थित होते. उपस्थितांचे आभार नुतन सचिव प्रसाद भास्कर यांनी मानले.