तालुक्याचा शैक्षणिक नांवलौकिक वाढविण्यात बिपिनदादा कोल्हे यांचा सिंहाचा वाटा – रावसाहेब जाधव

Mypage

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ५ : कोपरगाव शहरासह तालुक्याचा शैक्षणिक नांवलौकीक वाढविण्यात संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांचा सिंहाचा वाटा असून गेल्या पंधरा वर्षांपासुन ते गरीब होतकरू हुशार, गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत वहयांचे वाटप करून एकप्रकारे उभारी देत असल्याचे प्रतिपादन जय जनार्दन सोसायटीचे अध्यक्ष रावसाहेब जाधव यांनी केले.

Mypage

            तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या कासली येथील प्राथमिक शाळेतील मुला मुलींना नुकतेच बिपिनदादा कोल्हे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोफत वहयांचे वाटप करण्यांत आले त्याप्रसंगी ते अध्यक्षपदावरून बोलत होते. 

Mypage

          प्रारंभी माजी सरपंच शिवाजीराव भगुरे यांनी संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या मोफत वही वाटप अभियानाची माहिती दिली. मुख्याध्यापक श्री. रामदास लांघी म्हणाले की, मोफत वहया वाटपाचे उपक्रम समाजासाठी प्रबोधन करणारे असुन येथुन शिक्षण घेवुन बाहेर पडणा-या विद्यार्थ्यांनी आपले कर्तव्य म्हणून गांव, शाळेसाठी प्रेरणादायी उपक्रम राबवुन या नांवलौकीकात आणखी भर घालावी.

Mypage

    ब जाधव पुढे म्हणाले की, तालुक्याचा पुर्वभाग हा माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचा बालेकिल्ला असुन या भागावर त्यांची नेहमीच कृपादृष्टी राहिलेली आहे. संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांनी तत्कालीन सभापती म्हणून प्राथमिक शिक्षणाच्या पायाभूत सुविधा वाढविल्या. भाजपाच्या प्रदेश सचिव सौ. स्नेहलता कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे हे या पंचक्रोशीतील उपेक्षीत घटकांचे प्रश्न, त्याचप्रमाणे शेतक-यांच्या समस्या सोडविण्यासाठी जाणिवपुर्वक काम करत आहेत. संजीवनी उद्योग समुह येथील प्रत्येक संकटात नेहमीच मदतीला धावून येतो. तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या शिक्षणाला बळ देण्यासाठी मोफत वहया वाटपाचा उपक्रम हा जिल्हयात नावलौकीकास्पद आहे असेही ते शेवटी म्हणाले.

Mypage

            याप्रसंगी कासली सहकारी सोसायटीचे अध्यक्ष दत्तु मलिक, प्रकाश मलिक, चांगदेव मलिक, विश्वास जमधडे, अशोक मलिक, प्रदिप अहिरे, ज्ञानेश्वर राउत, अभिजित वायाळ, शिवाजी गायकवाड, रणजित वासनिक, पुषा बि-हाडे आदींच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यांत आले. सुत्रसंचलन व आभार बाबासाहेब काळे यांनी मानले. 

Mypage