शेवगाव येथे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज पादुका दर्शन सोहळ्याचे आयोजन

शेवगाव प्रतिनिधी, दि.०१ :  श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान दक्षिण पिठ यांचे वतीने जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज याचा पादुका दर्शन सोहळा खंडोबा मैदान, शेवगाव येथे सोमवार दि.५ फेब्रुवारीला सकाळी ठीक ९ वाजता आयोजित करण्यात आला आहे.

जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थांच्या वतीने अनेक समाज उपयोगी उपक्रम राबविले जातात, जसे की ग्राम स्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमाची मोफत शाळा, वैद्यकीय उपक्रमांतर्गत मोफत दवाखाना, मरणोत्तर देहदान रक्तदान शिबिर, मोफत रुग्णवाहिका सेवा महाराष्ट्रातील विविध महामार्गावर ५२ रुग्णवाहिका २४ तास अखंडपणे अपघातग्रस्तांच्या सेवेत कार्यरत आहेत. या सेवेला १४ वर्षे झाली असून आजपर्यंत २० हजाराच्यावर रुग्णाना मदत झाली.

आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन महिला सक्षमीकरण अंतर्गत मोफत शिलाई यंत्र वाटप, आपत्कालीन मदत उपक्रम, कायदेविषयक साक्षरता शिबीर असे उपक्रम राबविले जातात. पादुका दर्शन सोहळा कार्यक्रमात सकाळी पादुका, गुरुपुजन सोहळा, श्रींच्या पादुकांचे आगमन गुरुपुजन, आरती सोहळा, प्रवचन, भक्त दिक्षा, दर्शन, पुष्पवृष्टी संपन्न होणार आहे.

तरी या पादुका दर्शन सोहळ्याच्या कार्यक्रमास उपस्थित राहावे असे आवाहन जिल्हा सेवा समितीच्या वतीने सोमेश्वर घोगरे, निरीक्षक, सागर तिखे, जिल्हाध्यक्ष जिल्हा सेवा समिती अहमदनगर दक्षिण यांनी केले आहे.