बिजनेस एक्सपोमध्ये श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाचे स्पृहणीय यश

कोपरगांव प्रतिनिधी, दि. १८ : येथिल महात्मा गांधी चॕरिटेबल ट्रस्ट  या ठीकाणी दिनांक ९ मार्च ते १४ मार्च दरम्यान ‘शिवबा माझा मानाचा, एक्सपो आपल्या गावाचा’ या विचारावर लायन्स, लिनेस व लिओ क्लब आॕफ कोपरगांव आयोजित बिजनेस एक्सपो व सांस्कृतिक महोत्सवा मध्ये श्रीमान गोकुळचंदजी विदयालयाने विविध स्पर्धामध्ये सहभागी होत स्पृहणीय कामगिरी केली.

शालेय चित्रकला स्पर्धेत कु. जारा शेख ८अ या विद्यार्थिनीचा  तृतीय क्रमांक आला. शालेय निबंध स्पर्धा मध्ये कु. साक्षी खोतकर हीला व्दीतीय क्रमांक ७००/- रोख तर कु.जोया पठाण हीला  तृतीय क्रमांक५००/- रोख रुपये मिळाले. या विदयार्थींना अनिल अमृतकर, अतुल कोताडे, सौ.एस.आर.अजमेरे, अनिल काले, सुरेश गोरे यांनी मार्गदर्शन केले.

सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आयोजनात विदयालतील विदयार्थींनी छत्रपती शिवजी महाराजांचे जीवन चरीत्रावरील  सामुदायिक नृत्य सादर केले. या नृत्याला तृतीय क्रमांक मिळाला. ७०००/-रोख व प्रशस्तीपत्र, स्मृतीचिन्ह असे बक्षिसांचे स्वरुप आहे. या नृत्यामध्ये ध्रुव हेमंत लोहकणे, प्रथमेश किशोर जाधव, योगीराज रवींद्र निकुंभ,विराट गोविंद शिंदे,ललित आप्पासाहेब शिंदे, अभिजीत सचिन सुपेकर, प्रथम विश्वास गुमास्ते, रुद्र सुरेंद्र बेलदार, साई रवींद्र शिवदे, सुजय प्रशांत कुलकर्णी, साईराज दिनेश जाधव, साची संतोष मुदबखे,

  क्रांती लक्ष्मण लासणकर, अनन्या वीरेश मापारी, शिवानी सागर कुंढारे, श्रद्धा शंकर सोनवणे, वैष्णवी संजय गंगुले, शिवानी दिनू शर्मा, कावेरी रमेश म्हस्के, अमृता युवराज शिरसाठ, मानसी पंकज पडवळ, रेणुका सागर पवार, साक्षी संजय उनवणे, सिदरा मोहसीन पठाण आदि विदयार्थींनी भाग घेतला. या सर्व विदयार्थींना सौ.सी.व्ही निंबाळकर,सौ.पल्लवी तुपसैंदर या शिक्षकांनी मार्गदर्शन केले.

या सर्वाचे कोपरगांव एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष कैलास ठोळे,सचिव दीलीप अजमेरे, स्थानिक स्कुल कमिटीचे चेअरमन चंद्रकांत ठोळे, सहसचिव सचिन अजमेरे , स्कूल कमिटी सदस्य संदीप अजमेरे, डॉ.अमोल अजमेरे, राजेश  ठोळे तसेच मुख्याध्यापक मकरंद को-हाळकर, उपमुख्याध्यापक रमेश गायकवाड, पर्यवेक्षिका श्रीमती उमा रायते यांनी अभिनंदन  केले आहे.