प्रेमात आडथळा ठरलेल्या बहीणीचा सख्या बहीनीने काढला काटा

Mypage

कोपरगाव शहर पोलीसांनी उघड केला गुन्हा 

Mypage

 कोपरगाव प्रतिनिधी, दि. ६: प्रियकरासोबत पळुन जाण्याच्या तयारीत असताना छोट्या सख्या बहीणीने पळुन जाण्यापासुन आढवले तसेच मोबाईल वरुन प्रियकराशी बोलताना अचानक पडल्याचा राग मनात धरुन प्रेमात आडथळा ठरलेल्या १६ वर्षाच्या सख्या बहीणीचा गळा दाबुन खुन केल्याच्या घटनेने खळबळ उडाली. आत्महत्या केल्याचा बनाव करणाऱ्या बहीणीचा खरा चेहरा शहर पोलीसांनी उघड केला आहे. 

tml> Mypage

 या घटनेची पोलीसांकडुन मिळालेली अधिक माहीती अशी कि, कोपरगाव तालुक्यातील कोकमठाण शिवारातील तीन चारी परिसरातील सृष्टी नवनाथ बानकर वय १९ वर्षे या युवतीचे आकाश राजेंद्र कांगुणे याच्याशी प्रेमसंबंध होते. प्रियकर आकाश कांगुणे याने आपली प्रियेशी सृष्टी हिच्याशी सहज संपर्क साधुन नियमित बोलता यावे यासाठी एक मोबाईल फोन गुपचुप दिला होता.

Mypage

माञ सृष्टीची लहान बहीण हर्षदा हिला आपल्या बहीणीचे प्रेमसंबंध असुन तिला कोणीतरी मोबाईल दिला आहे आणि त्यावरुन दोघांचे संभाषण होत असल्याची खाञी पटताच तिने हा सर्व प्रकार आपल्या आईवडिलांना सांगितला. आईवडिलांनी सृष्टीचाजवळचा मोबाईल फोन काढुन घेवू तिला काॅलेजला जाण्याचे बंद केले.

Mypage

आपल्या प्रियकराशी बोलणे भेटणे बंद झाल्याचा राग मनात होता त्यातच प्रियकरासैबत पळुन जाण्याच्या तयारीत असताना हर्षदाने मोठी बहीण सृष्टीला आडवले. या दोन्ही गोष्टीचा राग आल्याने  ३०सप्टेबंर रोजी सायंकाळी साडे चारच्या दरम्यान  सृष्टीने आपली छोटी बहीण हर्षदा नवनाथ बानकर हिचा  ओडणीने गळा दाबुन राहत्या घरात खुन केला आणि हर्षदाने आत्महत्या केल्याचा बनाव केला. 

Mypage

 दरम्यान हर्षदाच्या आत्महत्येवरुन पोलीसांना संशय आल्याने पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांनी तपासाचे चक्रे फिरवून घटनेच्या तळाशी गेले असता अखेर वैरीन झालेली बहीण पोलीसांच्या समोर आपल्या कृत्याची कबुली देत मी माझ्या बहीणीचा खुन केल्याची कबुली दिली. मयत हर्षदाची आई संगिता नवनाथ बानकर यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीसात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Mypage