सिंगल युज प्लास्टिकच्या विरोधात नगरपरिषदेची मोठी कारवाई

Mypage

कोपरगांव प्रतिनिधी दि. २५ :  सिंगल युज प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुचनेनुसार आज मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांच्या मार्गदर्शनानुसार उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे, प्र. आरोग्य निरीक्षक सुनिल आरण व स्वच्छता अभियान नोडल ऑफिसर भालचंद्र उंबरजे यांच्या पथकाने आज शहरात सिंगल युज प्लास्टिकच्या विरोधात मोठी कारवाई केली.

Mypage

सदर कारवाईमध्ये शहरातील सात दुकानातून मोठ्या प्रमाणात प्लास्टिक जप्त करण्यात आले. यात कॅरीबॅग, प्लॅस्टिकचे ग्लास, थर्माकोल पत्रावळ्या, सिल्व्हर कोटेड पत्रावळी आदींचा समावेश आहे. सदरील दुकानदारांना पाच हजार रुपयांचा दंड परिषदेमार्फत ठोठावण्यात आलेला आहे.

Mypage

केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुचनेनुसार सिंगल युज प्लास्टिक बंदीच्या अनुषंगाने विशेष अभियान घेण्याबाबत राज्यातील सर्व नगरपरिषदांना कळविण्यात आलेले होते. त्यानुसार आज कोपरगाव नगरपरिषदेने शहरातील तुळजाभवानी कॉम्प्लेक्स भागातील उमेश पहाडे, महाल्क्ष्मी प्लास्टिक व ठोळे ट्रेडर्स या दुकानातून, स्टँड परिसरातील अग्रवाल फरसाण ( संदीप अग्रवाल), मेन रोडवरील संजय फरसाण तर येवला रोड येथील बालाजी फरसाण व देशी दारू दुकान (हमीत सातरण सातपुते) यांच्याकडून जवळपास अंदाजे 70-80 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आलेले आहे.  

Mypage

शासनाने सिंगल यूज प्लॅस्टिकवर बंदी घातलेली असतानादेखील शहरात विविध ठिकाणी सर्रास वापर होत आहे, यामुळे नगरपरिषदेने प्लॅस्टिकबंदीविरोधात धडक कारवाई सुरू केली आहे. अशाप्रकारची कारवाई येथून पुढे कायम राबविण्यात येणार असून शहरातील दुकानदारांनी सिंगल युज प्लास्टिकचा वापर करू नये असे आवाहन मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांनी केले आहे.

Mypage

सदर कारवाई मुख्याधिकारी तथा प्रशासक शांताराम गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे, प्र. आरोग्य निरीक्षक सुनिल आरण व स्वच्छता अभियान नोडल ऑफिसर भालचंद्र उंबरजे, प्रशांत उपाध्ये, रामनाथ जाधव, अरुण थोरात, राजेंद्र शेलार, मनोज लोट, पवन हाडा, रविंद्र दिनकर, रमेश घोरपडे, विजय डाके, अरुण फाजगे, कैलास आढाव, भिवसेन पगारे, सतीष साबळे, कवलजित लोट, जावेद शेख, प्रविण पोटे यांनी केली.  

Mypage