कोपरगाव प्रतिनिधी, दि. ३० : पन्नास वर्षापेक्षा जास्त अपेक्षाने निळवंडे धरणाचे पाणी मिळेल या आशेने जिरायती भागातील शेतकऱ्याला न्याय मिळू शकत नाही ही फार खेदाची बाब आहे. २००८ सालापासून निळवंडे धरणात अडवलेले पाणी जिरायत भागत मिळत नाही हा एक प्रकारचा त्यांच्यावर अन्याय होत आहे, कारण या जिराईत भागाला निळवंडे धरणातील पाण्याशिवाय दुसरा पर्यायच नाही. बाकीच्या जिल्ह्यातील बागायत भागाला अन्य पर्याय उपलब्ध आहेत.
रांजणगाव तळेगाव या परिसराला निळवंडे व्यतिरिक्त कुठलाच पर्याय उपलब्ध नाही हा त्यांच्यावर एक प्रकारे फार मोठा अन्याय आहे. महाविकास आघाडीच्या काळात अत्यंत सुरळीत काम चालू असलेलं गौण खनिज मिळत नाही हे कारण फारच कमालीचं अस्वस्थ करणारा आहे, केंद्र व राज्य सरकारने या परिसरातील जनतेच्या सहनशक्तीची अधिक परीक्षा पाहू नये.
राज्यातील शेतकरी विरोधी सरकार सुबुद्धी मिळो, शेतकरी हिताची म्हणजेच पिक विमा असेल, अतिवृष्टी नुकसान भरपाई, कोपरगाव- संगमनेर – कोपरगांव व्हाया रांजणगाव रस्ता दुरुस्ती असो वा निळवंडे कालवे पूर्ण करणे कामी गौण खनिज उपलब्ध होऊन न देणे मुळे निर्माण झालेला प्रश्नांबाबत लवकरात लवकर सोडवावा अन्यथा कोपरगाव तालुका काँग्रेसच्या वतीने रांजणगाव, जवळके परिसरात रस्ता रोको आंदोलन करण्यात येईल. तसेच निळवंडे कालव्यांच्या रखडलेल्या कामाच्या बाबतीतल्या बैठकांचा फार्स बंद करावा असेही कोपरगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन शिंदे म्हणाले.