संजीवनी पाॅलीटेक्निकचा फुटबाॅल संघ विभागीय पातळीवर प्रथम  

कोपरगांव प्रतिनिधी, दि. ३० : इंटर इंजिनिअरींग डीप्लोमा स्टुडंटस् स्पोर्टस् असोसिएशन (आयईडीएसएसए), महाराष्ट्र  राज्य प्रायोजीत ई १ झोन विभागीय सामन्यांमध्ये संजीवनी के.बी.पी. पाॅलीटेक्निकच्या फुटबाॅल संघांने प्रतिस्पर्धी संघांवर दणदणीत विजय मिळवुन वर्चस्व सिध्द केले. आता हा संघ संजय घोडावत पाॅलीटेक्निक, हातकणंगले, जि. कोल्हापुर येथे घेण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धां जिंकण्यासाठी जोरदार तयारी करीत आहे, अशी माहिती संजीवनी पाॅलीटेक्निकने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

पत्रकात पुढे म्हटले आहे की, राक्षी ता. शेवगांव येथिल ढाकणे पाॅलीटेक्निक येथे विभागीय फुटबाॅल सामन्यांसाठी ई १ झोन मधिल विविध पाॅलीटेक्निक व डी. फार्मसी संस्थांमधिल एकुण १५ संघांनी सहभाग नोंदविला. यात संजीवनीचा कर्णधार निखिल रमेश पाटील याच्या नेतृत्वाखाली, महेश उमेश वाघ, उत्तम कुमार, स्मिथ राहुल भावसार, अथर्व भारत वाघमारे, भावी अनंत चव्हाण, स्मीथ भाऊसाहेब लवांदे, ओम अजय मोरे, कुणाल गणेश शिंदे, आशिष  चंद्रकांत साळुंखे, एम. डी. फैजानराजा, सिध्दार्थ राजेंद्र वाके, राजन आदर्श जाधव, चित्तरंजन कुमार व एम. डी. सैफुला यांनी सलग चार सामने एकतर्फी जिंकत अंतिम फेरीत प्रवेष केला. अंतिम सामन्यात गव्हर्नमेंट पाॅलीटेक्निक, अहमदनगर संघाविरूध्द  २- ० गोलने विजय संपादीत करत संजीवनीचा फुटबाॅल संघ थेट राज्यस्तरीय स्पर्धांसाठी पात्र ठरला.


संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे, विश्वस्त सुमित कोल्हे, जीमखाना प्रमुख डी. एन. सांगळे यांनी सर्व विजयी खेळाडूंचे अभिनंदन करून त्यांना राज्यस्तरीय स्पर्धांसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच अमित कोल्हे यांनी सर्व विजयी खेळाडूंचा छोटेखानी कार्यक्रमात सत्कार केला. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर, सर्व विभाग प्रमुख, डीन्स, क्रीडा प्रशिक्षक शिवराज पाळणे व फुटबाॅल कोच करणवीर बांबु उपस्थित होते.