तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत रोहमारे महाविद्यालयास यश 

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १४ : एस.एस.जी.एम. महाविद्यालय येथे पार पडलेल्या आंतर महाविद्यालयीन तालुकास्तरीय मैदानी स्पर्धेत के. बी. रोहमारे कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी 19  वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात घवघवीत यश संपादन केले आहे.

विजयी खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे – मुली – आरती जगताप – 400 मी. धावणे द्वितीय,1500 मी. धावणे प्रथम, सपकाळ  तन्वी – थाळीफेक प्रथम, त्रिभुवन मयुरी – तिहेरी उडी प्रथम, चव्हाण वर्षा-गोळाफेक तृतीय,
मुले – उदय सोनवणे – 3000 मी. धावणे व 5000 मी धावणे द्वितीय, आयान सय्यद -1500 धावणे द्वितीय, गडाख प्रविण 110 मी. हडल्स द्वितीय व थाळीफेक तृतीय, वदक रोहीत -तिहेरी उडी प्रथम, 400 मी हडल्स-जामदार श्रेयस प्रथम व शेख अबुजर द्वितीय.  

4 X 100 रिले रेस मुले व मुली तृतीय क्रमांक वरील प्रथम व द्वितीय क्रमांकाचे खेळाडू अहमदनगर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेत कोपरगाव तालुक्याचे प्रतिनिधित्व करतील.

वरील सर्व खेळाडूंच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अशोक रोहमारे, सचिव ॲड. संजीवदादा कुलकर्णी, विश्वस्त संदिप रोहमारे, प्राचार्य डॉ. बी. एस. यादव, महाविद्यालयाचे रजिस्ट्रार डॉ. अभिजीत नाईकवाडे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बी. आर. सोनवणे यांनी अभिनंदन केले व पुढील स्पर्धेकरिता शुभेच्छा दिल्या. विजयी खेळाडूंना महाविद्यालयाचे शा. शि. संचालक डॉ. सुनिल कुटे व क्रीडा शिक्षक मिलिदं कांबळे यांनी मार्गदर्शन केले.