प्रजासत्ताक दिनी संविधानाचे सामूहिक वाचन

शेवगाव प्रतिनिधी, दि. २७ : प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून काल गुरुवारी ( दि.26) शेवगाव येथील क्रांती चौकात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या आवाहनाला प्रतिसाद देत भारतीय संविधानाचे सामुदायिक वाचन करण्यात आले. यावेळी
भारतीय कम्युनिस्ट पक्ष व समविचारी पक्ष, विविध संघटनांच्या वतीने संविधानाचे सामूहिक वाचन करण्यात आले.

      यावेळी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव एडवोकेट सुभाष पाटील लांडे म्हणाले, जेंव्हा पासून भाजपकडे सत्ता आली तेंव्हा पासून आपल्या लोकशाहीवर, राज्यघटनेवर आणि धर्मनिरपेक्षतेवर सतत आघात करण्यात येत आहेत. आपल्या लोकशाहीला उद्ध्वस्त करण्याचे, इतिहासाचे चुकीचे पुनर्लेखन आणि राष्ट्रीयत्वाची चुकीची पुनर्व्याख्या करण्याचा भाजप-आरएसएसच्या संमिश्र प्रयत्नांना हाणून पाडावे. या उद्देशाने २६ जानेवारीला घटना दिवस म्हणून साजरा करण्यात आला.  आज सर्व धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रेमी जनतेने एकत्र येऊन  हे षडयंत्र हाणून पाडले पाहिजे.

     सायली राहुल वरे या विद्यार्थिनीने भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे वाचन करून संविधानाचे महत्त्व विशद केले.
यावेळी भाकपचे राज्य कौसिंलसदस्य काँ.संजय नांगरे, राम लांडे , कृष्णा पवार, कारभारी वीर, संजय लहासे, भगवान गायकवाड, वैभव शिंदे, संदीप इथापे, गोरख काकडे, यौहान मगर, राजेंद्र मगर, विश्वास हिवाळे, शेखर तिजोरे, कडू मगर, अनिल इंगळे, पास्टर संदीप मगर, फास्टर प्रकाश पहिलवान, दत्तात्रेय आरे, जॉन मगर, भगवान भारस्कर, पटवेकर भन्तिजी आदिंसह नागरीक उपस्थित होते.