कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : कोपरगाव शहरात सुरु असलेली विकासकामे निर्धारित वेळेत पूर्ण करून विकासकामांच्या गुणवत्तेला प्राधान्य द्या अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहरात सुरु असलेल्या विकासकामांच्या पाहणी दरम्यान उपस्थित अधिकारी व ठेकेदारांना दिल्या आहेत.
गुरुवार (दि.२६) रोजी आ. आशुतोष काळे यांनी शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम आटोपल्यानंतर कोपरगाव शहरात सुरु असलेल्या विविध विकास कामांची पाहणी केली. यामध्ये १३१.२४ कोटी निधीतून सुरु असलेल्लेया ब्रिजलाल नगर येथील पाण्याची टाकी व वितरण व्यवस्था तसेच १ कोटी निधीतून सुरु असलेल्या कोपरगाव नगरपरिषदेच्या उद्यान सुशोभिकरण, १० लाख निधीतून श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर सुशोभीकरण आदी कामांची राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांसमवेत पाहणी केली.
यावेळी उपस्थित अधिकारी व ठेकेदारांना सूचना करतांना कामाच्या गुणवत्तेला प्राधान्य देवून आराखड्यानुसारच कामे करा. संबंधित अधिकाऱ्याच्या परवानगीशिवाय आराखड्यात बदल करू नका, श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीपूर्वी १९ फेब्रुवारीच्या आत सुशोभीकरणाचे काम पूर्ण करा, पाणी पुरवठ्याच्या टाकीतून सगळ्या भागाला पाणी पोहोचल पाहिजे असे नियोजन करा आदी सूचना आ. आशुतोष काळे यांनी यावेळी दिल्या.
यावेळी पद्माकांत कुदळे, महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शन चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव धरमचंद बागरेचा, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष सुनील गंगुले, कार्याध्यक्ष संतोष चवंडके, माजी नगरसेवक, गटनेते विरेन बोरावके मंदार पहाडे, अजीज शेख, हाजी मेहमूद सय्यद, कृष्णा आढाव, फकीर कुरेशी, रमेश गवळी, दिनकर खरे, युवक शहराध्यक्ष नवाज कुरेशी, डॉ. तुषार गलांडे, चंद्रशेखर म्हस्के, जावेद शेख, रावसाहेब साठे, प्रकाश दुशिंग, बाळासाहेब रुईकर, अशोक आव्हाटे, वाल्मीक लहिरे, संदीप कपिले, आकाश डागा, राजेंद्र जोशी, मनोज कडू, मन्नू कृष्णानी, राजेंद्र आभाळे, इम्तियाज अत्तार, अंबादास वडांगळे, शुभम लासुरे, शैलेश साबळे, महेश उदावंत, एकनाथ गंगुले, रहेमान कुरेशी, किशोर डोखे, विलास आव्हाड,
सचिन गवारे, बापू वढणे, विशाल निकम, पुंडलिक वायखिंडे, विजय बंब, विलास पाटोळे, शिवाजी कुऱ्हाडे, प्रशांत वाबळे, डॉ. आतिष काळे, सागर लकारे, मुकुंद भुतडा, बाळासाहेब शिंदे, मनोज नरोडे, योगेश नरोडे, अय्युब कच्छी, लक्ष्मण सताळे, हर्षल जयस्वाल, अमन मनियार, गोरख कानडे, विजय नागरे, हारूण शेख, उमेश दीक्षित, राकेश शहा, शेखर रहाणे शितल लोंढे, भाग्यश्री बोरुडे, ऋषिकेश सांगळे, आकाश गायकवाड, जुनेद शेख, अभिषेक मगर, प्रकाश कदम, उपमुख्याधिकारी ज्ञानेश्वर चाकणे, रचना सहाय्यक नितीश मिरीकर, आर्किटेक्ट राजेंद्र मुंजे आदी उपस्थित होते.