शेवगाव प्रतिनिधी, दि. १२ : महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत भारतीय जतना पक्षाच्या नेत्या पंकजाताई मुंडे यांचेसह महायुतीचे ९ उमेदवार निवडणुन आल्याचा जल्लोष आमदार मोनिकाताई राजळे समर्थाकांनी शेवगांव येथे केला.
विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या पंकजाताई मुंडे, परिणय फुके, योगेश टिळेकर, अमित गोरखे, सदाभाऊ खोत, शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या भावना गवळी, कृपाल तुमाने, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजेश विटेकर, शिवाजीरावर गर्जे यांच्या निवडीचा जल्लोष करण्यात आला.
शेवगांव येथील लोकनेते स्वर्गीय गोपिनाथ मुंडे साहेब यांचे पुतळ्याला पुष्पहार अर्पन करून कार्यकर्त्यांनी पेढे भरवून आनंद व्यक्त केला, यावेळी फटाक्याची मोठ्या प्रमाणावर अतिषबाजी करण्यात आली.
यावेळी भाजपाचे जेष्ठ नेते केशव आंधळे, सुभाष बडधे, गंगाभाऊ खेडकर, गणेश रांधवणे, महेश फलके, संजय खेडकर, कैलास सोनवणे , संभाजी कातकडे, गणेश कोरडे, विनोद शिंदे, अनिल वडागळे, अमोल माने, किरण काथवटे, बाळासाहेब झिरपे, चंद्रशेखर मुरदारे, प्रसाद वाघ, अभिजित अंधारे, सुरेश भोकरे, भैय्या वाघ आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार मोनिकाताई राजळे ह्या पंकजाताई मुंडे समर्थक असुन शेवगांव पाथर्डी तालुक्यावर स्व. गोपिनाथ मुंडे साहेबांपासुन मुंडे घराण्याचे प्रेम आहे.