बोधेगाव रेणुका मल्टिस्टेटच्या नेत्ररोग शिबीरास प्रतिसाद

Mypage

शेवगाव प्रतिनिधी, दि. ११ : राज्यातील अग्रगण्य अशा श्री रेणुकामाता मल्टिस्टेट संस्थेच्या  बोधेगाव शाखेचा वर्धापनदिन नुकताच मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापनदिनाचे औचित्य साधून श्री रेणुकामल्टीस्टेट बोधेगाव शाखा, शेवगाव रोटरी क्लब व पुण्याचे बुधराणी हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने  मोफत नेत्ररोग तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला.

Mypage

या  शिबिरामध्ये बुधराणी हॉस्पिटलच्या  डॉ मनिषा कोरडे यांचे पथकाने एकुण ६४ रुग्णांची तपासणी  केली. पैकी १३ रुग्णाची शस्त्रक्रीया करण्यासाठी निवड करण्यात आली. यावेळी आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी बोधेगावचे माजी सरपंच रामजी अंधारे  होते. सुकळीचे सरपंच प्रल्हाद देशमुख, खरेदी विक्री संघाचे संचालक विकास घोरतळे, बन्नोमिया दर्गा पंचकमिटी अध्यक्ष कुंडलिक घोरतळे, पद्माकर . आंधळे,   संजय बनसोडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Mypage

      शिबीर यशlवी करण्यासाठी रेणुकाचे शाखाधिकारी आदीनाथ पांडुळे,  वैष्णवी वैद्य, विशाल अंधारे, सुशील गायकवाड  आदीनी विशेष योगदान दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रोटरीचे अंध मुक्त व्हिलेज संकल्पना प्रोजेक्ट चेअरमन बाळासाहेब चौधरी ‘यांनी केले तर पांडूळे यांनी आभार मानले. 

Mypage

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *