अतिपावसामुळे नुकसान झालेल्या शेती पिकांचे पंचनामे करण्याच्या आमदार राजळेच्या प्रशासनाला सूचना 

Mypage

शेवगांव प्रतिनिधी, दि. ११ : मागील आठवडयात सततच्या पावसामुळे शेवगांव तालुक्यातील शेती पीके व फळ पिकांचे नुकसान झालेल्या क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना तहसिलदार व कृषी विभागाला सूचना  दिल्याची माहिती आमदार मोनिकाताई राजळे यांनी दिली.

Mypage

याबाबत सविस्तर वृत्त असे की, शेवगांव-पाथर्डी मतदारसंघातील काही गावात विशेषता: पाथर्डी तालुक्यात समाधानकारक पाऊस झालेला नसला तरी परतीच्या सततच्या पावसामुळे शेवगांव तालुक्यातील सुमारे ५४ गावामध्ये शेती पीके व फळ पीकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झालेले आहे.

Mypage

प्राथमिक माहितीनुसार शेवगांव तालुक्यातील आव्हाणे बुद्रुक व खुर्द, बऱ्हाणपूर, शहापूर, सुलतानपुर खुर्द, शहजापूर, आखेगांव तितर्फा, आखेगांव, अमरापुर, भगूर, वरुर बुद्रुक व खुर्द, खरडगांव, सालवडगांव, आपेगांव, नांदूरविहीरे, भातकुडगांव, ढोरजळगांव शे, निंबे, ढोरजळगांव ने, गरडवाडी, मलकापुर, वाघोली, वडूले खुर्द व बुद्रुक, सामनगांव, मळेगांव, देवटाकळी, ढोरसडे, अंत्रे, जोहरापुर, खामगांव, हिंगणगांव, दहिगांव ने, रांजणी, घेवरी, देवळाणे, भायगांव, मजलेशहर, बक्तरपुर, खुंटेफळ, दादेगांव, ताजनापुर, बोडखे, कर्जत खुर्द, शहरटाकळी,

Mypage

भावीनिमगांव, सुलतानपुर बुद्रुक, कांबी, गायकवाड जळगांव, हातगांव, पिंगेवाडी, या गावामध्ये १ ऑक्टोबर ते ७ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत सततच्या पावसामुळे कापूस, तुर, बाजरी, सोयाबीन, या पिकांबरोबरच फळ पिकांचे सुमारे २०२४६ हेक्टर क्षेत्र बाधीत झाले असून २७१०५ शेतकर्यांच्या शेती पिकाचे नुकसाने झाले आहेत. त्यामुळे शेतकर्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्ग कोपामुळे हिसकावला गेला आहे.आमदार  राजळे यांनी महसूल प्रशासन, कृषी विभाग यांना  तातडीने  या नुकसानीचे पंचनामे करुन अतिवृष्टी नुकसान भरपाई मिळणेसाठी शासनास अहवाल देण्याच्या सूचना केल्या आहेत.

Mypage