समताच्या विद्यार्थ्यांना परदेशत शिक्षणाची उत्तम संधी – कुलदीप कोयटे

Mypage

कोपरगाव प्रतिनिधी, दि. २७ : शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातील अविभाज्य घटक आहे. यामुळे त्याच्या जीवनाला कलाटणी मिळत असते. उच्च प्रकारचे शिक्षण घेऊन आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी प्रत्येक जण शोधत असतो. अमेरिका, इंग्लंड, सिंगापूर, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, जर्मनी या देशातील हॉवर्ड, केंब्रिज यांसारख्या विद्यापीठांमध्ये शिक्षण घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. परदेशात शिक्षण घेण्यासाठी सुसंवाद कौशल्ये, स्वतःहून अभ्यास करण्याची तयारी, शिस्त, संस्कार महत्वाचे आहेत.

Mypage

परदेशात करिअर करून आपल्या देशाचे उतरायी होण्याची संधीही आपल्याकडे असते. ती आपण आपल्या कला कौशल्यातूनच दाखवून दिली पाहिजेत. समता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना परदेशातील शिक्षण आणि करिअर करण्याच्या उत्तम संधी उपलब्ध असल्याचे कुलदीप संदीप कोयटे यांनी सांगितले.

tml> Mypage

 समता इंटरनॅशनल स्कूलच्या इ.८ वी ते इ.१० वीच्या विद्यार्थ्यांना ‘परदेशातील शिक्षण पद्धती व करिअरच्या संधी’ या विषयावर अनमोल मार्गदर्शन करताना ते बोलत होते. सलग १ तास चाललेल्या मार्गदर्शनवर व्याख्यानातून मिळालेल्या महत्वपुर्ण माहितीबद्दल विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले होते. तसेच अर्धा तास चाललेल्या शंका समाधानात विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत होता.

Mypage

अधिक माहिती देताना ते म्हणाले की, परदेशात उच्च शिक्षण घेताना अनेक वेगवेगळ्या सरकारच्या स्कॉलरशिप असतात. शैक्षणिक गुणवत्तेमुळे स्कॉलरशिप मिळू शकते. परदेशातील सामाजिक, सांस्कृतिक पर्यावरणातून आपल्याला करिअरच्या संधी प्राप्त होत असतात. भारतीय संस्कृती आणि तेथील संस्कृतीशी मेळ घालून तेथील शिक्षण आत्मसात करायचे असते.

Mypage

 या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शिक्षिका जलीश शाद यांनी केले. प्राचार्या हर्षलता शर्मा यांच्या हस्ते कुलदीप कोयटे यांचा सन्मान करून सत्कार करण्यात आला. या वेळी समता इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या हर्षलता शर्मा, विद्यार्थी, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांचे आभार शिक्षिका शोभा गद्री यांनी मानले.

Mypage