कोपरगावच्या निंबाळकर, पठाण यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर                            

कोपरगाव प्रतिनिधी, दि. ९ : शिक्षक दिनानिमित्त दरवर्षी महाराष्ट्र राज्य नगरपालिका, महानगरपालिका शिक्षक संघातर्फे दिले जाणारे आदर्श मुख्याध्यापक, आदर्श शिक्षक पुरस्कार संघाचे राज्याध्यक्ष अर्जुन कोळी यांनी जाहीर केले आहे. 

यात राज्यातील 70 शिक्षकांनी हे पुरस्कार प्राप्त केले आहेत. यामध्ये कोपरगाव नगरपालिका शाळा क्रमांक ६ च्या मुख्याध्यापिका कल्पना भाऊसाहेब निंबाळकर तर कोपरगाव नगरपालिका शाळा क्रमांक ५ च्या उपक्रमशील शिक्षिका नसरीन जाकीर पठाण यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार जाहीर झाला आहे.

या उभायतानी आपल्या विद्यार्थी व शाळेकरिता विविध शैक्षणिक उपक्रम राबवून आनंददायी व मनोरंजनातून शिक्षण दिले. नवनवीन तंत्र ज्ञान, डिजिटल साधने वापरून शिक्षण सोपे केले.आर्थिक परिस्थिती जेमतेम असणाऱ्या विदयार्थ्यांकरिता स्वखर्चाने शिक्षण देऊन सामाजिक बांधिलकी जपली आहे.           

 कोपरगाव नगरपालिकेचे मुख्याधिकारी शांताराम गोसावी, प्रशासनाधिकारी राजेंद्र डामसे, राज्य सरचिटणीस अरुण पवार, महिला आघाडी प्रमुख साधना साळुंके, कार्याध्यक्ष सुभाष कोल्हे, अहमदनगर जिल्हा अध्यक्ष फारुख शहा, सल्लागार नवनाथ अकोलकर, सविता साळुंके, वरिष्ठ लिपिक अमित पराई, समन्वयक प्रशांत शिंदे, सुनिल रहाणे, माणिक कदम, मुब्बाशीर खान, कैलास साळगट सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले. हे राज्यस्तरीय पुरस्कार वितरण ८ ऑक्टोबर २०२३ रोजी पनवेल येथे मंत्रिमहोदय यांचे शुभ हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.