आमदार आशुतोष काळे अखेर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गोटात

मतदार संघाचा विकास डोळ्यासमोर ठेवून घेतला निर्णय

कोपरगाव प्रतिनिधी, दि. १२ : विदेशात असलेले तालुक्याचे लोकप्रतिनिधी आमदार आशुतोष काळे यांनी भारतात आल्याबरोबर राज्यातील सत्ताधारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत आपला पाठींबा दर्शविला आहे. त्यामुळे राजकीय भूकंप झाल्यापासून गुलदस्त्यात असलेली आमदार काळे यांची भूमिका आता स्पष्ट झाली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अर्थात पवार कुटुंबात उभी फुट पडल्यानंतर राज्यातील अनेक आमदारांनी आपापल्या भूमिका स्पष्ट करत काहींनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बरोबर सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला तर काहींनी सत्तेपेक्षा राष्ट्रवादीचे मूळ संस्थापक खासदार शरद पवार यांना मानत त्यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला. काही मोजके आमदार तटस्थ भूमिकेत होते.कोपरगाव विधानसभेचे आमदार आशुतोष काळे विदेशात गेल्याने ते नेमेके कोणत्या पवारांना आपले करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

अखेर मंगळवारी आमदार काळे विदेशातून आल्या बरोबर बुधवारी सकाळीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे जावून प्रत्यक्ष भेट घेत सत्ताधारी पवारांसोबत सामील झाले. त्यामुळे गेल्या अनेक दिवसापासून विचारात पडलेल्यांना आमदार काळे यांनी मि अजित पवारांचा समर्थक आहे. हे आज पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. वास्तविक पहाता मतदार संघाच्या शेजारी असलेल्या शहा पांचाळे येथील एका जाहीर कार्यक्रमात तत्कालीन विरोधी पक्षनेते आताचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या साक्षीने भर सभेत जर अजित पवार यांनी मला जल संपदा मंत्री करावे अशी आशा काळे यांनी त्यावेळी बोलून दाखवली होती.

कदाचित सत्त्तेमध्ये गेलेल्या अजित पवारांमुळे काळे यांना सत्तेच्या माध्यमातून काही तरी मिळेल या अपेक्षेने काळे अजित पवारांच्या जवळ गेले असावे असा अंदाज मतदार संघात वर्तवला जात आहे. दरम्यान पवार कुटुंबातील सलोख्याचे संबंध असणारे काळे कुटुंबीय आहे. स्व. माजी खासदार शंकरराव काळे यांच्यापासून रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शरद पवार आणि काळे कुटुंब हा वेगळा जिव्हाळा राज्यात निर्माण झाला. त्याला अनुसरूनच रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागाच्या प्रमुख पदी आमदार आशुतोष काळे यांची शरद पवार नियुक्ती केली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्याशी आशुतोष काळे यांचे ऋणानुबंध असताना हि काळे आजी पवार यांच्या गटात गेल्याने चर्चेला उधान आले आहे.

आमदार आशुतोष काळे यांच्याशी संपर्क साधण्याचा संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. त्यामुळे ते नेमके कोणती भूमिका घेवून अजित पवार यांच्या गटात सामील झाले हे स्पष्ट समजत नसले तरी सत्ताधारी पक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेच काळे यांना जवळीक वाटले असावे. मतदार संघातील राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते हे आशुतोष काळे यांच्या बरोबर असल्याने काळे ज्या गटात तोच पक्ष आमचा असा नारा सुरु झाला आहे.  

कोपरगाव मतदार संघाच्या विकासाचे स्वप्न डोळ्यासमोर ठेवून आज मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेवून त्यांना पाठींबा दिला .आदरणीय शरदचंद्र पवार साहेब हे आमचे दैवत आहे. त्यांचे आशीर्वाद नेहमीच आमच्या पाठीशी आहेत याचा मला विश्वास आहे. मी घेतलेल्या या निर्णयाला सर्व कार्यकर्त्यांचा व कोपरगाव मतदार संघातील मतदारांचा पूर्ण पाठींबा राहील याची मला खात्री आहे. आमदार आशुतोष काळे आहा आशयाची पोस्ट कार्यकर्ते सोशल मिडीयावर टाकून आमदार काळे यांची प्रतिक्रिया व्यक्त करत आहे.