प्रथम प्रेमाचा फास नंतर लग्न व धर्मांतरासाठी ञास

कोपरगावच्या युवतीवर अत्याचार करुन धर्मांतराठी जबरदस्ती झाल्याने खळबळ उडाली

 कोपरगाव प्रतिनिधी दि.१२ : कोपरगाव शहरातील एका हिंदू युवतीला सोशल मीडियाच्या माध्यमातून जवळीक साधून तीच्याशी मैञीचे संबंध प्रस्थापित करीत अलगद आपल्या जाळ्यात ओढुन तिच्या इच्छेविरुद्ध  शारिरीक संबंध ठेवून त्या घटनेचे फोटो व व्हिडिओ काढून त्यावरून वारंवार धमकी देत लग्न करण्याबरोबर धर्मांतर करण्याची धमकी देत असल्याची घटना कोपरगावच्या युवती सोबत घडल्याने खळबळ उडाली तर काहींचा संताप अनावर झाला आहे. 

 या घटनेची पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, कोपरगाव शहरातील एका युवतीची ओळख इन्स्टाग्रामवरुन मध्यप्रदेशातील इंदौर येथील सायम कुरेशी याच्याशी झाली. ओळखीतून जवळीक साधत त्याने संबंधित युवतीशी मैञी वाढवली त्यातुनच त्या युवतीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा सायम कुरेशी यशस्वी झाला. तिनं वर्षांपासून दोघांचे मैञीसंबध वाढत गेले. याच दरम्यान सायम कुरेशी याने संबंधीत युवतीला भेटण्याची इच्छा व्यक्त केली माञ युवतीने नकार देताच सायम कुरेशी याने आपल्या साथीदारांच्या मदतीने तुझ्या कुटुंबातील सदस्यांना मारून टाकण्याची धमकी दिली.

घाबरलेल्या युवतीने २१ मे २०२३ रोजी सकाळी तो  कोपरगांव बसस्थानकावर  बोलावून घेतले. संबंधीत युवती भेटायला येताच कुरेशी यांच्या साथीला कोपरगाव येथील स्थानिक इम्रान आयुब शेख , फय्याज कुरेशी रा. आयशा काॅलनी संजयनगर कोपरगाव व छोटू उर्फ कलिम  पुर्ण नाव समजू शकले नाही. हे हजर होते. मोटारसायकलवर बसण्यासाठी जबरदस्ती करु लागले. शेवटी दोघांनी  मोटारसायकल बसवून शहरातील आण्णाभाऊ साठे पुतळ्या जवळील काटवणात घेवू गेले तिथे झटापटी करुन त्यांनी खडकी जवळील  मदरसा येथे युवतीला घेवून गेले तिथे कुरेशी याचे तीन साथीदार यांनी युवतीचे हात पाय धरुन युवतीवर कुरेशी याला अत्याचार करण्यास मदत केली. त्या झालेल्या अत्याचाराची फोटो व व्हिडिओ काढून पिडीत युवतीला वारंवार दमबाजी करण्यात आली.

त्यानंतर पिडीत युवतीला मुख्य आरोपी कुरेशी याने मैञिनीच्या लग्नाचे कारण सांगून इंदौरला बोलावून घेत होता. पिडीत युवती जाण्यासाठी तयार नव्हती तेव्हा माझ्या स्थानिक सहकाऱ्यांच्या मदतीने तुझ्या आई वडीलांना संपवून टाकीन. तुझे फोटो व व्हिडिओ व्हायरल करुन तुझी बदनामी करीन अशा धमक्या देवू लागल्याने अखेर पिडीत युवती मध्यप्रदेशातील  इंदौर येथील जुना पिंठा  या ठिकाणी गेली असता आरोपी कुरेशी यांने पुन्हा युवतीवर अत्याचार करुन तेथील एका मौलवीकडून तिला नमाज पठन करून घेतले.

तसेच लग्न करुन धर्मांतर करण्याची जबरदस्ती करण्यात आली असल्याची  तक्रार खुद्द पिडीत युवतीने कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये दिली आहे असे सांगण्यात आले. पिडीत मुलीवर संबंधीत आरोपींकडून दबाव टाकण्यात आला तसेच धमकी दिल्याचे सांगण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तर सांघिक पध्दतीने हिंदूंच्या मुलींना प्रेमात फसवून धर्मांतर करण्याची विकृती वाढली असल्याची चर्चा कोपरगाव शहरात सुरु आहे.

 दरम्यान कोपरगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांनी संबंधित युवतीची तक्रार राञी उशिरा दाखल झाल्या बरोबर पोलीसांचे दोन पथके आरोपीच्या शोधासाठी रवाना केले. पोलीस उपनिरीक्षक भरत दाते, पोलीस उपनिरीक्षक रोहीदास ठोंबरे, पोलीस कर्मचारी, दिलीप तिकोने गणेश मोड, संभाजी शिंदे, ज्ञानेश्वर भांगरे, श्रीकांत कु- हाडे, यमाजी सुंबे, राम खारतोडे, महेश फड, गणेश काकडे यांनी राञभरात धरपकड सुरु केली अखेर  मुख्य आरोपी सायम कुरेशी  याला इंदोर येथुन ताब्यात घेण्यात आले तर इम्रान शेख व फय्याज कुरेशी दोघांना कोपरगाव  परिसरातून ताब्यात घेण्यात आले, तर इंदौरचा मौलवी व अन्य एकाचा शोध पोलीस घेत आहेत.

 पालकांनो सावधान आपली मुलगी मोबाईलवर काय करते किंवा आपली मुलं काय करतात कोणती गेम खेळतात कोण कोणत्या मिञ मैञीणी बरोबर चॅटिंग करतात. राञी अपराञी मोबाईलवर काय करतात यावर लक्ष ठेवणे गरजेचे आहे अन्यथा… कोण कोणाच्या नांदी लागून आयुष्य बरबाद करेल सांगता येणार नाही.

 कोपरगाव येथील युवतीवर झालेला अत्याचार व धर्मांतरासाठी केलेल्या प्रयत्नांमुळे हिंदू संघटना आक्रमक  पविञ्यात आहेत तर. हिंदू मुस्लिम असा भेदभाव न करता या घटनेमधील सत्य बाहेर आले पाहिजे. 

 प्रेमाचा भाग आहे की अन्य काय आहे . जर खरच मुस्लिम युवकांनी जबरदस्तीने काही चुकीचे  केले असेल तर त्यांना भर चौकात फाशी द्या पण दोन धर्मात तेढ  निर्माण होईल असा  चुकीचा संदेश पसरवू नये अशी प्रतिक्रिया मुस्लिम बांधवांनी केली आहे. 

 या घटनेचा सखोल तपास करणार असुन यातील दोषींवर कठोर कारवाई करणार आहे माञ  या घटनेमागे इतर कोणाचे धागेदोरे आहेत का. याला कोणी खत पाणी घालतय की अन्य काय आहे याची योग्य दिशेने चौकशी करणार आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी दिली.