कोपरगाव प्रतिनिधी, दि. ८ : सिंजेटा इंडिया प्राइवेट लिमिटेड यांच्या वतीने माहेगांव देशमुख येथे शेतकरी बांधवांसाठी मका पीक प्रात्यक्षिक व विविध चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंजेंटा कंपनी गेल्या अनेक वर्षापासून उच्च प्रतीची बियाणे तयार करत आहेत.
शेतकऱ्यांच्या उत्पादनात भरघोस वाढ होऊन शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत असल्याने सिंजेंटा कंपनी शेतकऱ्यांच्या विश्वासाचे प्रतीक बनली आहे. सोबत यावर्षी सिंजेंटा वाण NK 6540, Nk6802, Nk7328 हे वाण शेतकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रगतशील शेतकरी नितीन चंद्रभान पानगव्हाणे यांच्या शेतावर मका वाण NK 6540 या वाणा वर पीक प्रात्यक्षिक कार्यक्रम पार पडला. या वाणाविषयी कंपनीचे कोपरगाव प्रतिनिधी अभिषेक पाटील व दौलत गायके, येवला यांनी NK 6540 या वाणाची वैशिष्ट्ये व खत पाणी व्यवस्थापन कसे करावे याबाबत मार्गदर्शन केले.
या वाणाची वैशिष्ट्ये म्हणजे कोरडवाहू शेतीसाठी उत्पन्नाचा भरवसा, टोकापर्यंत भरले एकसमान आकाराची कणसे, अनियमित पावसात पण उत्पादनचे आश्वासन ही वैशिष्ट्ये सांगितली. मका पिकाच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी कोणत्या प्रकारची खते वापरावी याचे प्रिव्ही लाईफ सायन्सेस प्रा.लि. मुंबईचे डिस्ट्रिक्ट ऑफिसर ऋषिकेश काळे यांनी योग्य पद्धतीने मार्गदर्शन केले, एकरी उत्पन्न कसे काढावे याची माहिती दिली. तसेच शेतकरी नितीन पानगव्हाणे यांना एकरी ४०.९३ क्विंटल पर्यंत उत्पन्न निघेल असे कंपनी प्रतिनिधींनी सांगितले.
यावेळी मातोश्री कृषी सेवा केंद्र, मोठेबाबा कृषी सेवा केंद्र, श्रीराम कृषी सेवा केंद्र, प्रगतशील शेतकरी बाबासाहेब पानगव्हाणे, मधुकर काळे, रामनाथ मोगल, बाळू रोकडे, छोटू उगले, किरण काळे, रवींद्र लांडगे, दत्तात्रय पानगव्हाणे, विकास रणसिंग, वरूण काळे, वैभव मुटकुळे, खंडू काळे, संजय शिंदे, यादव काळे, नारायण काळे, पराग काळे, लखनदास बैरागी, राहुल काळे, भास्कर पानगव्हाणे, मिथिलेश काळे, खंडू काळे, बाळू नाना आहेर, रवींद्र देशमुख, अक्षय काळे, शुभम काळे, मयूर काळे, अरुण काळे, योगेश देशमुख, गणेश कदम, अक्षय कदम, सोनू मोरे व आदी शेतकरी उपस्थितीत होते.